Home / महाराष्ट्र / कोलगावात अभ्यासिका...

महाराष्ट्र

कोलगावात अभ्यासिका सुरू करणारा ध्येयवेडे गुरूजी

कोलगावात अभ्यासिका सुरू करणारा ध्येयवेडे गुरूजी

लॉकडाऊनमध्ये देत आहे विद्यार्थ्याना ज्ञानाचे धडे
 
 मारेगाव(प्रतिनिधी ): संपूर्ण जगात कोरोना?ने हाहाकार  केला असून नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे त्यातच अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचाही बट्याबोळ झाला असतांना कोलगाव येथील  विजय घोडमारे या शिक्षकाने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असलेले पाहून गावातच  काही लोकांच्या मदतीने  कोरोनाचे सर्व नियम पाळत एक अभ्यासिका सुरू केली असून त्याचा अनेक विद्यार्थ्याना फायदा होत आहे.
     कोरोनाने अनेक नागरिकांना उध्वस्त केले  हे सर्व दृश्य एकाद्या सिनेमा सारखे असले तरी प्रत्यक्षात या गोष्टीचा सामना करणे सोपे नाही. परन्तु काही लोक असतात ध्येय वेडे, त्यांना त्यांची कला जिद्द निवांत झोपू देत नाही .समाजासाठी काही तरी करावं असे त्यांना नेहमीच वाटत असते.असेच कोलगाव येथील जिल्हा परिषद शिक्षकाने   गावात अभ्यासिका सुरू करून अनेकांना ज्ञानाचे दार उघडून दिले त्यामुळे अनेकांना आज लाभ मिळत आहे.
     चीन मधील कोरोना भारतात व भारतातील शिक्षण पद्धती वर असर करेल असे कधीच वाटले नव्हते. पण मार्चमध्ये कोरणा मुळे शाळांना सुट्ट्या लागल्या. ऑनलाईन शिक्षण पाहिजे तेवढे परिणाम कारक नसल्याने गावातील मुले रिकामेच फिरताना दिसत होते. आपला शिक्षकाचा पिंड असल्याने विद्यार्थ्यांचे रिकामे फिरणे मनाला दुःख देणारे आहे असे त्यांना  वाटले. सर्वच विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे काय देता येईल हा एक विचार घोडमारे सरांच्या डोक्यात आला. तसेच सकाळच्या फिरण्यात गावातील बरेच तरुण मुले पोलीस भरतीसाठी तयारी करीत असल्याचे दिसत होते. मुले शारीरिक फिटनेस वर खूप लक्ष द्यायचे परन्तु बौद्धिक कडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. त्यावेळी घोडमारे सरांनी गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना एकत्र आणत गावच्या हनुमान मंदिरात  विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणे सुरू केले. आपल्या गावातील मुले पुणे मुंबई सारख्या शहरात जाऊन स्पर्धापरीक्षेची तयारी करू शकत नाही किंवा तेवढे तज्ञ मार्गदर्शक आपल्याकडे नाहीत पण  युट्युब च्या माध्यमातून  प्रत्येक विषयाचे घटकानुसार नियोजनबद्ध व्हिडिओ रात्री आठ ते नऊ या वेळात अगदी क्रमाने विद्यार्थ्यांना दाखवून त्यावर चर्चा घडवून आणून व झालेल्या भागावर आठ दिवसानंतर पेपर घेणे असा नित्यक्रम सुरू केला.      
बघता बघता  या उपक्रमाची व्याप्ती वाढली  आणि सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अभ्यास करावा यासाठी गावातील  जागाही मिळाली. या अभ्यासिकेसाठी अर्चना ताई बोदाडकर यांच्या 'एकच ध्यास मदतीचा हात' संस्थेकडून अभ्यासिके साठी पुस्तके व खुर्च्या मिळाल्या. आज आमच्या गावातील मुले या अभ्यासिकेत नियमित बसून अभ्यास करतात, त्यांचा अभ्यास पाहून, अभ्यासावरच्या चर्चा पाहून इतर मुले ही अभ्यासाच्या प्रवाहात जुडतांना पाहून येणाऱ्या काळात गावातील  विद्यार्थी मोठे अधिकारी नक्कीच घडताना दिसेल यात शंका वाटत नाही. असे घोडमारे सर आवार्जुन सांगतात,ते म्हणतात की शहरांमध्ये अभ्यासाचे वातावरण आहेत पण खेड्यांमध्ये ही असे वातावरण तयार होण्यासाठी अभ्यासिकेची खूप मदत होईल असे वाटते कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू न दिल्याचा आनंद वाटतो.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...