मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
भारतीय समाजाला देव धर्म श्रद्धा अंधश्रद्धा कर्मकांडाच्या जाळ्यात बांधुन हजारो वर्षापासून शारिरीक मानसिक गुलाम केलं गेलं त्या समाजाला प्रस्थापितांच्या या पाशातून सोडविण्यासाठी पुरुषोत्तम खेडेकर नावाच्या एका धेय्यवेड्या मानसाने मराठा सेवा संघ नावाने पुरोगामी विचाराच्या एका क्रांतीकारी विचारधारेचे १ सप्टेंबर १९९० रोजी बीज रोवले.याच बिजातून जगातला एकमेव मातृत्वाचा सन्मान करणारा, महिलांना सर्वोच्च स्थान देणारा, राष्ट्रमाता जिजाऊंच्या रुपाने स्त्रीला प्रेरणास्थानी ठेवून मातृत्वाचा सन्मान करणारा, काळाच्या ओघात लुप्त झालेला, विश्वातला एकमेव वैभवशाली महान असा मातृसत्ताक धर्म, ज्यात मानवता हाच खरा धर्म व मानव हिच खरी जात ही शिकवण असलेला,जगावर मातृसत्तेच अधिराज्य निर्माण करु शकेल अशा शिवधर्माच प्रकटन करणारा खरा धर्मजेता म्हणून पुरुषोत्तम खेडेकर हे एकमेव जगातलं नाव येणाऱ्या काळात असणार आहे यात शंका नाही. शिवधर्मासाठी आपल्या प्रगाढ तत्वज्ञानाने प्राचीन महान अशा सिंधुसंस्कृतीचे संशोधन करुन भारतीयांच्या आचरणासाठी 'शिवधर्म गाथा' शिवधर्म संसदेला सुपुर्द करुन मानवाला शिवधर्माद्वारा त्याच्या कल्यानाचा मार्ग दाखविणारे प्राच्यविद्यापंडीत आ.ह.साळुंखे सर या दोघांचे भारतीय समाज कधीच ऋण फेडू शकणार नाही.
धर्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग, आपण कसं आदर्श जीवन जगावं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं प्रत्येकाला स्वातंत्र्य असते. माणुस हा कोणत्याच धर्मात जन्माला येत नसतो तर तो मातेच्या उदरातून जन्माला येतो, या दृष्टीने जर विचार केला तर त्याचा खरा धर्म ही त्याची माताच असते कारण तिच त्याला जन्म दिल्यापासून बोट धरुन जगण्याचा मार्ग दाखवित असते.परंतु आजपर्यंत पुरुष हाच जीवनाचा मार्गदाता म्हणून सर्वच धर्मात त्या त्या धर्माचा प्रेरणास्थान म्हणून प्रस्तुत केल्या गेला आहे. विश्वाची जननी असणारी जन्मदात्रीच जीवनाची खरी मार्गदाती असते. खऱ्या मार्गदात्या मातेला प्रेरणास्थान मानणारा धर्म जगात नसवा हे समस्त स्त्री जातीसाठी आजपर्यंत खेदाची बाब होती. जगाच्या पाठीवर जे जे धर्म अस्तित्वात आहे त्यावर पुरुषप्रधान संस्कृतीचाच प्रभाव दिसतो, धर्माचा मार्गदाता,धर्माचा संस्थापक प्रामुख्याने पुरुषच आहे. त्या धर्मसंस्थापकाने किंवा त्यांच्या नावावर इतरांनी घालून दिलेली लिखीत नियमावली म्हणजे त्या धर्माचा धर्मग्रंथ पुरुषश्रेष्ठत्वाचे गोडवे गाणारे व स्रीला दुय्यम स्थान देवून बंधनात टाकणारेच बहुतांश असल्याचे दिसून येते. शिवधर्माने ही पोकळी भरुन काढली. जगातली निम्मी जनसंख्या असलेल्या स्त्रीयांच्या सन्मानासाठी वर्तमान युगातल्या महान अशा मराठा सेवा संघ या पुरोगामी चळवळीने काळाच्या ओघात लुप्त झालेल्या आपल्या महान प्राचीन मातृसत्ताक सिंधुबळीशिव संस्कृतीचे चिकित्सक संशोधनात्मक अभ्यासाअंती सत्त्य शिव सुंदर मंगल अशा विज्ञाननिष्ठ निसर्गपुजक, माॕ.जिजाऊंच्या रुपाने आदर्श मातृत्वाचं प्रतिक असलेल्या, स्त्रीलाच आपलं प्रेरणास्थान मानून, शिवधर्माचं १२ जानेवारी २००५ ला मातृतिर्थ ! सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवी प्रकटन करुन शिवधर्म संसदेने "शिवधर्म गाथा" धर्मग्रंथाच्या रुपात आचरणासाठी उपलब्ध करुन जगातला एकमेव स्त्री सन्मानाचा शिवधर्म जगाला दिला. शिवधर्माचे प्रकटन ही वर्तमान युगातील महान क्रांतिकारक घटना आहे.
जेव्हा कोणताही विचार जनमानसाच्या ह्रदयात घर करते तेव्हा आपोआप शासनाला सुद्धा त्याची नोंद घ्यायला भाग पाडत असते. ज्या ज्या धर्माची नोंद सरकार दप्तरी आहे त्या धर्माच्या नावाची नोंद जनतेच्या एकसंघ शक्तीच्या आचरणाचा परिपाक असून वर्तमान युगात त्याचे असलेले अस्तीत्व आहे.शिवधर्म हा काळाच्या ओघात हजारो वर्षापुर्वी आक्रमकांकडून लुप्त झालेला शिवधर्म आमचा स्वधर्म होय. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आमचा शिवधर्म माहीत करुन देण्याचा काळ हा अवघा २५ वर्षाचा आहे. या आमच्या खऱ्या स्वधर्माला गुलाम करुन आम्ही भारतीय हजारो वर्षापासून गुलामीच्या धर्मजाळ्यात अडकलेलो आहोत. या जाळ्यातून एका एका मानसाची सुटका करने पाहिजे तेवढं सोप काम नाही.एक दिवस नक्की येणार या धर्माची नोंद भारत सरकारलाच काय तर विश्वाला घ्यावी लागेल.दस्तावेज नोंद ही जनभावनेचा उद्रेक असतो.या आमच्या हजारो वर्ष लुप्त असलेल्या धर्माला जनमानसाच्या पटलावर आणण्यासाठी आणि जनसामान्याचा उद्रेक होण्यासाठी २५ वर्षाचा काळ नगण्य आहे.आजची राजकीय परिस्थिती बघता या देशातल्या ओबीसीलाच ओबीसीची दप्तरी ओळख करुन द्यायला सरकार तयार नाही तर गुलाम करणार्यांचं धार्जिणी सरकार शासकीय दप्तरी शिवधर्माची नोंद किंवा ओळख करुन देणे म्हणजे त्यांनी स्वतःला मिटवून घेण्यासारखे आहे. त्यामुळे तसे ते कदापी होवू देणार नाही. तसे जर झालेच तर सर्व हिंदु धर्मिय आपल्या स्वगृही शिवधर्मी परतल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद शिवधर्माच्या तत्त्वज्ञानात व आमच्या मुळ अस्सल शिवसंस्कृतीत आहे. आज जे कोणी या गुलामीतून बाहेर आले ते हजारोच्या संख्येनी शिवधर्माचे आचरण करत असून हिच आमच्या धार्मिक स्वातंत्र्याची नांदी आहे.
शैक्षणिक दृष्या जरी महिलांनी प्रगती केली असली तरी आजही महिला या मनुवादी पुरुषप्रधान निसर्ग विध्वंसक यज्ञ संस्कृतिच्या देव धर्म कर्मकांडाच्या नावावर गुलाम झाल्या आहे. आर्यांच्या आक्रमणापुर्वीची साडेतीन हजार वर्षा अगोदरची आपली खरी मातृत्वाचा परम सन्मान करणारी प्राचीन मातृसत्ताक निसर्गपुजक सिधुबळी शिवसंस्कृती आपण पार विसरुन गेलो आहो. परंतु वर्तमान युगात मराठा सेवा संघ या महान पुरोगामी चळवळीने हडप्पा मोहेंजदारो कालीन या आपल्या महान संस्कृतीचं पुराव्यानिशी अभ्यासपूर्ण संशोधन केले. महान अशा प्राचीन निसर्गपुजक शिवसंस्कृतीचे शिवधर्माच्या रुपाने प्रकटन करुन जगातील एकमेव स्त्री सन्मानाचा धर्म स्त्रीलाच माॕ जिजाऊंच्या रुपाने आपलं प्रेरनास्थान माणून परत भारतातच नव्हे तर या विश्वात मातृसत्ताक स्त्रीयांच राज्य परत निर्माण करण्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवधर्माचं सुत्र दिलं आहे. तेव्हा माॕ जिजाऊ सावित्रीचं अधुर राहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी तमाम स्त्रीयांनी आपल्या गुलामीच्या बेड्या तोडून विज्ञानवादी सत्य मंगल शिवधर्माचा मार्ग अंगीकारुन शिवधर्म विश्वधर्म व्हावा व महिलांनी 'भारतावरच नव्हे तर जगावर मातृसत्ता निर्माण करुन महिलाराज आणावं हे या धेय्यवेड्या पुरुषोत्तमाच स्वप्न आहे.
*जगात एकमेव धर्म ज्याचं प्रेरणास्थान माॕ जिजाऊं च्या रुपाने मातृत्वाच परमोच्च प्रतिक असलेली ही स्त्री आहे.
*शिवधर्म जगातला एकमेव धर्म जो की व्यक्तीपुजेपेक्षा जनमानसाचा आदर करुन लोकतांत्रीक धर्म संस्थापक असलेली एकापेक्षा अधिक जानकार तज्ञांची परिवर्तनशील 'शिवधर्म संसद' ही शिवधर्माची संस्थापक आहे.
*शिवधर्म हा निसर्ग पुजक आहे,निसर्गातील मानव कल्यानकारक सर्व स्त्रोतांप्रती प्रेम आपुलकी जिव्हाळा असलेला धर्म आहे. त्यामुळे निसर्गातील मानव उपयोगी संसाधनाचा यज्ञामध्ये जाळून नाश करणारी निसर्ग विध्वंसक आक्रमनकारी यज्ञ संस्कृती शिवधर्म नाकारतो.
*शिवधर्मात जातपात,उच्च निचतेला कसलाही थारा नसुन मानव हीच खरी जात व मानवता हाच खरा धर्म हेच शिवधर्माचे सुत्र आहे.
*शिवधर्मामध्ये अंधश्रद्धेला अजिबात थारा नसून वैज्ञानिक दृष्टीकोनातूनच दैनंदिन आचरण केल्या जाते.
*सिंधुजनांची देव देवता गणली गेलेल्या श्रद्धास्थानाचे शिवधर्म त्यांचे काल्पनिक रुप नाकारुन त्यांना अस्सल मानवी रुपातील आपले प्रेरक महापुरुष मानते व त्यांच्याप्रती देव देवता मानणाऱ्यांपेक्षाही अधिक श्रद्धा शिवधर्माची आहे.
*शिवधर्मात पुरोहीत कर्मकांडाला अजिबात स्थान नसून संस्कार विधी स्वतः किंवा इतर कोणीही स्त्री अथवा पुरुष पार पाडू शकते.
*शिवधर्माच प्रेरणास्थानच ही स्त्री असल्याने प्रत्येक समारंभात स्त्री ला प्रथम प्राधान्याने सन्मान दिल्या जाते.
*शिवधर्मात अनिष्ट रुढी परंपरा टाळून सन उत्सव समारंभ साजरे करण्यास पुर्णपणे मुभा आहे.
*शिवधर्मात चिकित्सेला व काळाच्या ओघात आवश्यक बदलाला पूर्णतः मुभा आहे.
*मनुष्य जीवनात जन्मापासून ते मृत्युपर्यंत करण्यात येणारे संस्कार अगदी साध्या सहज सोप्या पद्धतीने कोणतेही कर्मकांडाचे अवडंबर न करता कुणालाही करता येईल अशी शिवधर्म अनुयायांसाठी शिवधर्म गाथेत सुंदर असे मार्गदर्शन केलेले आहे.
*शिवधर्माच्या संकल्पनेचा मुळ उद्देशच 'शिवधर्म विश्वधर्म व्हावा' संपूर्ण जगावर मातृसत्तेचं अधिराज्य निर्माण व्हावं, 'हे विश्वची माझे घर' हे स्वप्न साकार व्हावं हेच आहे.
अशा या धर्मजेत्या पुरुषोत्तमाने आम्हा दिलं हेची धन...
१) आम्हावर कधीच जादु टोना भुतप्रेताचा असर होणार नाही असं आमच्या शरीरातल्या मेंदुच लसीकरण करुन वैज्ञानिक दृष्टीकोन आमच्यात रुजवला.
२) आम्ही कधीच बंदुकीच्या गोळीने मरणार नाही असी वैचारिक लस देवून आमचं मन मनगट मेंदु सशक्त बणवलं.
३) शोषकांचे अदृष्य कपट कारस्थान स्पष्टपणे दिसण्याची व्यापक दृष्टी आम्हाला दिली.
४) दैववाद अंधश्रद्धा कर्मकांड यासारख्या मानसिक गुलामीच्या कैदेतून आमची सुटका करुन भयमुक्त मानवतावादी स्वातंत्र्याचा आनंद मिळवून दिला.
५) जीवन-मरणाच्या फेऱ्यातुन मुक्त करुन जेवढ आयुष्य आहे त्यात मानुसकीचं आदर्श जीवन जगण्याची उमंग दिली.
६) हातातले दगड धोंडे तलवार भाले बिचवे बारुत बंदुक काढून त्याऐवजी सर्वांवर मात करणारं पुस्तकरुपी लेखणीरुपी शस्त्र आमच्या हातात दिलं.
७) दुसऱ्याचं ऐकून वाचून खरं काय? खोट काय? याची चिकित्सा करुन स्वतःच साहित्य निर्माण करण्याची धमक आमच्यात निर्माण केली.
८) आमच्या घरातील कपाट भांडीकुंडी कपडेलत्ते व शोभेच्या वस्तुंनी भरले होते परंतु आज आमच्या घरातली कपाट पुस्तकांनी भरण्याचं काम त्यांनी केल.
९) जात धर्म पंथ पक्ष या पुढे जावून मानव आणि मानवता हाच खरा धर्म असा व्यापक दृष्टीकोन देवून देशाला धार्मिक व जातीय विद्वेषापासून रोखले शांती व सौहार्द प्रस्थापित करण्याचे फार मोठे कार्य आमच्या हातुन केले.
१०) आमच्या हिंदु धर्माचं शुद्धीकरण करुन खऱ्या महान प्राचीन मातृसत्ताक निसर्गपुजक सिंधु शिवसंस्कृतिचे शिवधर्माच्या माध्यमातून प्रकटन करुन आमच्या खर्या इतिहासाची जाणीव करुन दिली. धार्मिक गुलामगीरीतून मुक्त करुन आदर्श जीवनाच्या आचरणासाठी आपला सिंधुजनांचा खरा धर्म "शिवधर्म" दिला.
१,आज शिवधर्माचे आचरण सुमारे दोन कोटी लोक आपल्या जीवनात अंगीकारत आहे. गरीबातला गरीब मानुस वर्षभरात कमीत कमी पंधरा हजार रुपये कर्मकांडावर खर्च करतो आज आपण दोन कोटी लोकांचे कमीत कमी तीस हजार कोटी शिवधर्माच्या माध्यमातून कर्मकांडावर होणारा लोकांचा खर्च वाचवला असल्याचे त्यांनी सांगीतले.
२,शिवधर्म वाढावा यासाठी गांव पातळीपासून ते देश तथा विश्वपातळीपर्यंत शिवधर्म संसद (कमेटी) स्थापन करुन त्यांच्यामार्फत त्या त्या पातळीवर शिवधर्माचा प्रचार प्रसार व शिवधर्माच्या संस्कारानुसार उपक्रम व्हावे यासाठी नियोजन करुन अंमलबजावणी होणे गरजेचे आसल्याचे म्हणाले.
३,शिवधर्म गाथा मराठी हिंदी इंग्रजी शिवाय अन्य भारतीय भाषात व जागतीक भाषात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्या त्या भाषेच्या जाणकारांनी अनुवादासाठी पुढाकार घ्यावा.व ती घराघरात पोहचविण्यास मदत करावी.
४, मराठा सेवा संघ व ३३ कक्षाच्या चळवळीचे काम करणाऱ्या सर्व व्याख्याते,विचारवंतांनी आपल्या दिड दोन तासाच्या व्याख्यानातील कमीत कमी दहा मिनीटे शिवधर्म सांगण्यासाठी राखून ठेवावेत व आवर्जून शिवधर्म सांगावा अशी त्यांना विनंती केली.
५, शिवधर्म परिषदांचे आयोजन व्हावे व त्याद्वारा शिवधर्मावर व्याख्याने व्हावी.
इत्यादी बाबी आपण केल्या तर आपलं शिवधर्माच्या रुपान सिंधुजनांच शोषण विरहित प्राचीन वैभव प्राप्त होवून "शिवधर्म विश्वधर्म" व्हायला वेळ लागणार नाही अशी आशा व्यक्त केली. त्यांनी उराशी बाळगलेली आशा सफल होवो हिच त्यांच्या ४ जानेवारी त्यांच्या जन्मदिनी जिजाऊ चरणी वंदन करुन त्यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शिवशुभेच्छा ! ! !
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*खुदा नहीं तो खुदा से कम भी नहीं!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* मोदी जी गलत कहां कहते हैं। उनके विरोधी, असल में राष्ट्र-विरोधी...
*उद्घाटन नयी संसद का या रेंगती धार्मिक राजशाही का!* *(आलेख : राजेंद्र शर्मा)* नरेंद्र मोदी के राज के नौ साल की एक अनोखी...
*"अ.आ.नि.स.चे रविंद्रदादा जाधव राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्काराने सन्मानित!!* ✍️Dinesh Zade भारतीय वार्ता नवी दील्ली...