वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
शुद्ध पाणी मिळत नसल्याने ग्रामवासीयांत प्रचंड संताप, कंपनीची 5 वर्षांची वॉरंटी बंद अवस्थेत संपत असल्याची ग्रामवासीयांची ओरड.
आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी): तालुक्यातील महत्वाचं व मुकुटबन नंतर मोठं असलेलं गाव म्हणजे पाटण येथील आरोप्लान्ट दोन वर्षापासून बंद असल्याने वॉर्ड क्रं 1 मधील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत असुन 500 मीटर दूर असलेल्या आरोप्लान्ट वरून पाणी आणावे लागत असल्याने जनतेत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. माहितीनुसार पाटण येथील पोलीस स्टेशन समोरील आरोप्लान्ट शासनाचे लाखो रूपये खर्च करून दोन 2 वर्षांपूर्वी खनिज विकास निधी अंतर्गत बसविण्यात आला. मोठा गाजावाजा करत आमदार महोदय यांच्या हस्ते आरोप्लान्ट चे उदघाटनही करण्यात आले. उदघाटन करण्यापूरतेच फक्त आरोप्लान्ट सुरू करण्यात आला. उदघाटन दरम्यानच आरोप्लान्ट मधून फिल्टर पाणी न येता नळातून येणारे साधे पाणी आल्याचे ग्रामवासी बोलत आहे. दोन तासातच आरोप्लान्ट बंद करून गेले व दोन 2 वर्षे लोटूनही अजून पर्यंत जनतेला प्लांटचे शुद्ध पाणी जनतेला पिणे तर दूर अजून पहायला सुद्धा मिळाले नाही. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागला आहे तर ठेकेदार आपली झोळी भरून गायब झाला आहे. याकडे संबधीत अधिकारी व लोकप्रतिनिधींचे हेतु परस्पर दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले व संबधीत ठेकेदाराला आरोप्लान्ट सुरू करण्यास न सांगता पळविण्याकरिता मदत करीत असल्याची ओरड ग्रामवासी करीत आहे.
पोलीस स्टेशन समोरील आरोप्लान्ट खनिज विकास निधीतील असुन ते बंद अवस्थेत आहे. आरोप्लान्ट सुरू करण्याकरिता गावातील लोकांची तक्रार प्राप्त झाली आहे. पंचायत समिती व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे 15 दिवसाच्या आत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. 15 दिवसात आरोप्लान्ट सुरू न झाल्यास ग्रामपंचायतचा खर्च लावून आम्ही आरोप्लान्ट सुरू करून ग्रामवासीयांना पाण्याकरिता शुद्ध पाणी उपलब्द्ध करून देऊ - प्रशांती कासावार (सरपंच)
खनिज विकास निधी अंतर्गत लाखो रुपये खर्च करूनही एकही दिवस शुद्ध पाणी न मिळाल्याने जनतेत रोष निर्माण झाला आहे. आरोप्लान्ट सुरळीत चालण्याकरिता पाटण ग्रामपंचायत ने लाईनची व नळाद्वारे पाण्याची व इतर व्यवस्था करून दिली. परंतु एकही दिवस फिल्टर प्लांट चे पाणी ग्रामवासीयांना पाण्याकरिता मिळाले नाही. व फिल्टर आरोप्लान्टचा 5 वर्षाचा मेंटनंस जागेवरच संपत आहे. आरोप्लान्ट लावणारी कंपनी अजूनपर्यंत प्लांटकडे ढुंकूनही पाहिले नसल्याची ओरड गावकरी करीत असून आजपर्यंत प्लांट कुलूप बंद अवस्थेत आहे. आरोप्लान्ट करिता लावण्यात आलेली मशीन नित्कृष्ट दर्जाची असल्याने प्लांट बंद असल्याचा संशय ग्रामवासी करीत आहे. पाटण येथे ग्रामपंचायत मध्ये एक व पोलीस स्टेशन समोर एक असे दोन आरोप्लान्ट असून फक्त ग्रामपंचायत मधील आरोप्लान्ट सुरू आहे. पोलीस स्टेशन समोरील आरोप्लान्ट सुरू करण्याकरिता ग्रामवासीयांनी ग्रामपंचायतला लेखी तक्रार केली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने 15 दिवसात सदर आरोप्लान्ट सुरू करावे असे पत्र पंचायत समिती व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतने सादर केले आहे.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...