सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
Reg No. MH-36-0010493
✍️जगदीश का. काशिकर
मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे: सर्वसामान्य लोक कशाच्या मोहात पडतात हेच नेमकं ओळखून सायबर गुन्हेगार त्या पद्धतीचे नवनवीन सापळे रचत आहेत. आणि दुर्दैव हेच की.... सुजाण, शिकले सवरलेले लोक यात अडकत आहेत. काय करावे या लोकांचे तेच मला कळेना. अरे बाबांनो,जगात मोफत काहीही नसत. फुकट काहीही नसत.साड्या घ्यायला गेल्यावर दुकानदार कोल्ड्रिंक पाजतो. ते काय त्याच्या घरी तयार होते का ? नाही न ! तर त्याचे पैसे ऑलरेडी त्याने साडीमध्ये लावलेले असतात. हे आपल्याला कळत पण तरी आपल्याला ते छान वाटत. तसेच एकावर एक फ्री चे गौड बंगाल आहे. पण अनेकजण त्या मोहात पडतात अन फसतात. आता सायबर हॅकर (गुन्हेगार) लोकांनी याच मानसिकतेचा फायदा घेऊन नवीन सापळा रचला आहे. ते नेमकं काय करतात अन सापळा काय असतो, तो थोडक्यात सांगतो. सायबर गुन्हेगार नेमकं ते लक्षात घेतात आणि त्या दुकानदाराच्या नावाने परस्पर "टेलिमाकेर्टिंग करतोय" असं भासवत लोकांना कॉल करतात. मात्र त्यांच्या नावाने तुम्हाला कॉल येतो की, मुक्त तमुक डायनींग हॉलकडून बोलतोय. आमची "एका थाळीवर एक थाळी फ्री" स्कीम सुरु आहे. घरपोच डिलिव्हरी देखील आम्ही देतो. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर सांगा. तुम्ही मोहात पडता. एका थाळीच्या पैशात दोन मिळतात आणि तेही घरपोच. मग मोह होणारच न! तसे मग तुम्ही त्यांना "हो" सांगता मग ते म्हणतात की पेमेंट मात्र आधी करावे लागेल. त्यासाठी आम्ही एक बारकोड पाठवतो तो स्कॅन करून तुम्ही त्यावर वाटलं तर आधी दहा रुपये फक्त पाठवा. आम्ही ते पोचल्याचे कळवून दुसरा बारकोड पाठवू तेव्हा तो स्कॅन करून बाकीचे पैसे पाठवा."तुम्हाला यात कसलीच शंका येत नाही.
मात्र जेव्हा पहिला बारकोड तुम्ही स्कॅन करून दहा रुपये पाठवता तेव्हाच तुमचा मोबाईल त्या बारकोड मधील व्हायरसच्या मदतीने क्लोन (म्हणजे डुप्लिकेट) बनवला जातो तो असतो त्या हॅकरचा मोबाईल. म्हणजे थोडक्यात तुमच्या फोनवर तुम्ही जे जे कराल ते ते त्याला तिकडे दिसते.आणि तुम्ही दहा रुपये पाठवताना जे पिन / पासवर्ड वगैरे टाकता ते तो हॅकर तिकडे पाहत असतो. आणि मग दुसरा बारकोड येतो तेव्हा तुम्ही तो स्कॅन केल्यावर तात्काळ तुमचे बँक अकाउंट रिकामे केले जाते. म्हणजेच दुसरा बारकोड मध्ये असलेला व्हायरस सरळ तुमच्या बँकेचा ऍक्सेस आणि पिन / पासवर्ड सगळंच हॅकर ला देऊन टाकतो आणि तुमच्या खात्यातले पैसे पळवले जातात. दोनशे रुपयाची एक थाळी. त्यावर दोनशेची फ्री असं म्हणत तुम्ही फक्त दोनशे रुपये पे केलेले असतात पण तोवर तुमच्या खात्यात असतील नसतील तितके पैसे हॅकर पळवून मोकळे होतात.
कळलं ? दोनशेपायी एका व्यक्तीने (तेही पुण्यातल्या) दोन लाख रुपये अशा सापळ्यात अडकून घालवले आहेत. कधी सुधारणार आपण ? असं मोफत काहीही नसत जगात. हे कधी समजून घेणार ? एकावर एक थाळी फ्री याचाच अर्थ ऑल रेडी पहिलीच थाळी इतकी हाय रेटेड ठेवलेली होती की त्यातच दुसऱ्या थाळीचा नफा देखील सामावला होता. हे आपण का लक्षात घेत नाही. अहो साधं बाळ जोवर रडत नाही तोवर त्याला आई दूध पण देत नाही. मोफत का म्हणून कुणीतरी काहीतरी तुमच्यासाठी करेल ? डोकं वापरा न राव ! आणि अजून एक धोक्याचा इशारा आताच देतो. असे ऑनलाईन वर नवनवीन फ्रॉड वरचेवर वाढणार. विषय वेगळे असणार व त्यानुसार सापळे वेगळे असणार ! तेव्हा यात अडकू नका. जॆ काही असेल ते तिथं त्या हॉटेलात थेट जाऊन वाटलं तर ऑर्डर करा न अन घ्या एकावर एक फ्री ! ऑनलाईन असले व्यवहार करू नका. त्यातच तुमचे हित आहे.
असं कुठं असत का ? लोक पागल आहेत का अशा स्कीम मध्ये अडकायला ? असं म्हणू नका. लोक अडकत आहेत.उद्या कदाचित तुमचा नम्बर लागू शकतो. काळजी घ्या, सावध राहा असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी, सायबर अवेअरनेस फाऊंडेशनचे सदस्य धनंजय देशपांडे, पुणे यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...
*खुदा नहीं तो खुदा से कम भी नहीं!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* मोदी जी गलत कहां कहते हैं। उनके विरोधी, असल में राष्ट्र-विरोधी...
*उद्घाटन नयी संसद का या रेंगती धार्मिक राजशाही का!* *(आलेख : राजेंद्र शर्मा)* नरेंद्र मोदी के राज के नौ साल की एक अनोखी...
*"अ.आ.नि.स.चे रविंद्रदादा जाधव राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्काराने सन्मानित!!* ✍️Dinesh Zade भारतीय वार्ता नवी दील्ली...