मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
टाइम्स मधील आपल्या पत्रात आंबेडकर म्हणतात,' स्वराज्य हा जसा ब्राह्मणाचा जन्मसिद्ध हक्क आहे, तसाच तो महारांचा आहे, ही गोष्ट कोणीही मान्य करील. म्हणून पुढरलेल्या वर्गानी दलितांना शिक्षण देऊन त्यांच्या मनाची आणि सामाजिक दर्जाची उंची वाढविणे, हे त्यांचे आद्यकर्तव्य आहे. हे जोवार होणार नाही तोवर भारताच्या स्वराज्याचा दिन बराच दूर राहणार हे निश्चितच!" याच वर्षी दत्तोबा पवार ह्या गृहस्थाच्या मार्फत आंबेडकरांना राजश्री शाहू महाराज यांच्याशी प्रत्यक्ष परिचय होण्याचा योग जुळून आला.
टाइम्सशाहू महाराजांनी आंबेडकरांना आर्थिक साहाय्य देऊन एक पाक्षिक काढावयास लाविले. ते ' मुकनायक ' नावाचे पाक्षिक 31जानेवारी 1920 या दिवशी त्यांनी सुरु केले. त्या दिवसापासून आंबेडकरांनी त्या मूक समाजाचे नायकत्व स्वीकारले. पांडुरंग नंदाराम भटकर यांना आंबेडकरांनी संपादक नेमले होते. ते महार समजापैकी असून पुण्यातील डी. सी. मिशनमधून त्यांचे दहावी पर्यंत शिक्षण झाले होते. त्यांची पत्नी ब्राह्मण समाजापैकी होती. त्यापायी त्यांना बराच छळ सोसावा लागला होता. त्या पाक्षीकावर आंबेडकरांचे संपादक म्हणून नाव नसले, तरी ते आंबेडकरांनी सुरु केलेल्या चळवळीचे मुखपत्र होते, हे अनेकांना माहित होते. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने तो काळ किती प्रतिकूल आणि कठोर होता ह्याची कल्पना ' केसरी ' सारख्या वर्तमानपत्राने ' मुकनायका ' बद्दल दोन शब्द लिहिणे तर सोडाच,पण पैसे घेऊन त्याची जाहिरात सुद्धा छापण्याचे नाकारले, यावरून येईल. त्या वेळी टिळक ह्यात होते.
' मुकनायक ' पाक्षीकाच्या पहिल्या अंकात आंबेडकरांनी आपल्या पाक्षिकाच्या उद्देशाने समर्थन अगदी सुबोध, सरळ परंतु जोरदार आणि स्पष्ट भाषेत वाचकापुढे विचारार्थ मांडले. त्यांनी पहिल्याच अंकात लिहिले की,' हिंदुस्थान हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे. हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे एक एक मजला आहे. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या मनोऱ्यास शिडी नाही. एक मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे, त्यांनी त्याच मजल्यात मरावे. खालच्या मजल्यातील इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातील माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यावर लोटून देण्याची कुणाचीही छाती नाही.
सचेतन त्याचप्रमाणे अचेतन वस्तू ही सारी ईश्वराची रूपे आहेत असे म्हणणारे स्वाधर्मीयांचा विटाळ मानतात. सांप्रत ब्राम्हणाची महत्वाकांक्षा ज्ञानसंचय करण्याकडे आहे. ज्ञानाचा प्रसार करण्याकडे नाही. ब्राह्मणेतरांच्या अवनतिचे कारण सत्ता आणि ज्ञान यांच्या अभावामुळे ब्राम्हणेतर मागासले व त्यांची उन्नती खुंटली. युगानुयुगे चालत आलेले दास्य, दारिद्र ह्यांपासून बहिष्कृत वर्गाची मुक्तता करण्यासाठी आकाशपातळ एक केले पाहिजे. त्यांच्या डोळ्यात ज्ञानाचे अंजन घालून त्यांना आपल्या हिन परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे.
दुसऱ्या एका लेखात आंबेडकर म्हणतात, ' भारत स्वतंत्र होण्यानेच सर्व कार्यभाग साधेल, असे नाही. भारत हे असे राष्ट्र बनले पाहिजे की, ज्यात प्रत्येक नागरिकाला धार्मिक, आर्थिक आणि राजकीय हक्क सारखे असून व्यक्तीविकासाला प्रत्येक नागरिकाला वाव मिळेल. इंग्रजी राज्यविरुद्ध घेतलेला हा आक्षेप ब्राह्मणी राज्याविरुद्ध एखाद्या बहिष्कृताने घेतल्यास हजारपटीने शोभेल. हे विधान अप्रस्तुत अन अवास्तव आहे असे म्हणणारा कोणी पामर सापडेल असे दिसत नाही. इंग्रजी राज्यात ज्यांची बात सहन होत नव्हती, त्यांची लाथ सोसावी लागणार! म्हणून असे स्वराज्य द्या, की त्यात थोडेबहुत आमचेही राज्य आहे.'
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*खुदा नहीं तो खुदा से कम भी नहीं!* *(व्यंग्य : राजेंद्र शर्मा)* मोदी जी गलत कहां कहते हैं। उनके विरोधी, असल में राष्ट्र-विरोधी...
*उद्घाटन नयी संसद का या रेंगती धार्मिक राजशाही का!* *(आलेख : राजेंद्र शर्मा)* नरेंद्र मोदी के राज के नौ साल की एक अनोखी...
*"अ.आ.नि.स.चे रविंद्रदादा जाधव राष्ट्रीय संविधानरत्न पुरस्काराने सन्मानित!!* ✍️Dinesh Zade भारतीय वार्ता नवी दील्ली...