शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता दि. 24 (प्रतिनिधी) : कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात राज्य सरकार येत्या 1 मे रोजी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करण्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रात सुरू असलेले लसीकरण, ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठ्याविषयी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. या बरोबरच कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. आपल्या राज्याला ऑक्सिजनची अधिक गरज होती आणि ती भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी देखील चर्चा केली. त्यानंतर ऑक्सिजन टँकर विमानातून नेण्याची परवानगी देण्यात आली. रिकामे टँकर विमानातून नेण्यास परवानगी देण्यात आली असून भरलेले टँकर रेल्वे आणि रस्तेमार्गे आणण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार:
कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचा विचार करता बरे होणार्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण रुग्णालयांमध्ये येत आहेत. आम्ही काही निर्णय लाँग टर्मसाठीही घेत आहोत. केंद्र सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांवर जबाबदारी दिली आहे. त्यासाठी आम्ही 5 सदस्यीय समिती तयार करत आहोत. ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लसीचा विचार करण्यात येत आहे. या टेंडरमध्ये सर्व कंपन्यांच्या लसींना परवानगी देण्यात येत आहे. लस सीरमची असो, भारत बायोटेकची असो, फायजरची असो, अशा सर्व लसींचा ग्लोबल टेंडरमध्ये उल्लेख असणार आहे. 1 मे पासून अर्थात महाराष्ट्र दिनापासून राज्यात लसीकरण सुरू करण्याची राज्याची तयारी आहे, असेही ते म्हणाले.
राज्यातील बंद पडलेले ऑक्सिजनचे प्लांट आम्ही सुरू करत आहोत. यांपैकी काही प्लांट विजेअभावी, तर काही आर्थिक स्थितीमुळे बंद होते. ते आता सुरू होतील. त्याच प्रमाणे साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तशा सूचना शरद पवार यांनी दिल्याचेही त्यांनी सागीतलें आहे. जनतेचे भले तर राज्य भले असा पवित्रा महाआगाडीने घेतल्याचे समोर येत आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...