Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मो. पैगंबर बिल व मुस्लिम...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मो. पैगंबर बिल व मुस्लिम आरक्षण आणि विविध मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोनल

मो. पैगंबर बिल व मुस्लिम आरक्षण आणि विविध मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोनल

उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदनात

वणी :  मोहम्मद पैगंबर बिल आणि मुस्लिम आरक्षणासह मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी आणि राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विरोधी धोरणां विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयाचे समोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मुस्लिम समाजाच्या प्रमुख मागणांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.

देशात व राज्यात मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणाबद्दल केंद्र व राज्य शासनाकडे विविध समित्यांचे आणि आयोगाचे अहवाल पडून आहेत. मात्र शासन मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत कायमच उदासीन असल्याचे दिसून येते. न्यायालयाने मान्यता दिलेल्या ५% मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची शासन अंमलबजावणी करीत नाही यातच शासनाची अल्पसंख्याक विरोधी मानसिकता दिसून येते. तसेच धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करण्याच्या विरोधात बंधुतेच्या मूल्यांचे हनन होवू नये म्हणून "पैंगंबर मोहम्मद बिल" गेल्या अधिवेशनात वंचित बहुजन आघाडी तर्फे विधानपरिषद सदस्य आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून मांडण्यात आले.

मात्र शासनाने अजून या संबंधी काहीच कृती केली नाहीय. शासनाच्या याच वृत्तीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ५ जुलै २०२१ रोजी विधान भवनावर मोर्चा काढुन उपरोक्त मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पहोचवण्यात आले होते तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातून जनजागृती अभियान चालवण्यात आले तरी ही शासनातील तिन्ही पक्ष या मागणीकडे पुर्णत: दुर्लक्ष करत आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडी मुस्लिम प्रश्नांबाबत गंभीर असुन आज सोमवार २२ नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणां विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे.

यात प्रमुख मागण्या करण्यात खालील प्रमाणे करण्यात आल्या आहे. धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे 'पैगंबर मोहम्मद बिल' वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे, ते बिल येणाऱ्या  अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा ,न्यायालयाने मान्यता दिलेले ५% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे , महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मिळकती मध्ये वाढ करुन इमाम, व मुअज्जिन आणि खुद्दाम हज़रात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे, संत विचारांचा प्रचारप्रसार करण्याऱ्या ह.भ.प. कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे , वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा, सारथी-बारटी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी ,एस.टी. महामंडळ राज्य शासनात विलीन करुन  कर्मचाऱ्यांचा तिढा तात्काळ सोडवावा, वणी वेकोली क्षेत्रातील स्थानिकांना खाजगी कंपन्यांत रोजगार द्यावा, वणी तालुक्यातील शिंदोला- पुनवट मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई तात्काळ मिळण्यात यावी , वणी उपविभागातील पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रलंबित नक्षलग्रस्त भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा, रब्बी हंगाम शेतकऱ्यांचा सुरू झाला असून ऐन पेरणीच्या आणि सिंचनाच्या तोंडावर वीज कंपनीकडून शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाची वीज तोडण्यात येत आहे.

ती कार्यवाही थांबविण्यात यावी व  शेतकऱ्यांच्या कृषी बिलाची रक्कम माफ करण्यात यावी. या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग यांचे मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचे शहराध्यक्ष किशोर मुन, नरेंद्र लोणारे, निशिकांत पाटील आदि उपस्थित होते. असून निवेदनावर मिलिंद पाटील, गौतम जीवन रवी कांबडे, चांदकला उराडे, निखिल चाफले, उमेश परेकार, सुभाष लसंते, करण मेश्राम, नईम अजीज, सलीम खान, सईद अनवर, इरफान अली, इम्रान खान, असीम हुसेन, सुभाष गेडाम, आदि लोकांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

१४४ मुळे कार्यकाऱ्यांचा हिरमोड

ऐन वेळेवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधित होऊ नये म्हणून ५ लोकांच्यावर समूहात राहायला नागरिकांनी राहू नये साठी १४४ कलम आज २२ रोजी सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत लागू केल्याने वंचित चे शेकडो कार्यकर्ते आल्या पावली माघारी गेल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

वंचितच्या आंदोलनाला 
AIMIM चा पाठिंबा

मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायाला वंचित बहुजन आघाडी वाचा फोडत असल्याने या आंदोलनाला AIMIM चे वणी शहराध्यक्ष आसीम हुसेन यांनी आपला पाठिंबा दर्शविला .

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...