Home / चंद्रपूर - जिल्हा / विभागांनी आजादी का...

चंद्रपूर - जिल्हा

विभागांनी आजादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करावे -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

विभागांनी आजादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करावे -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दि. 6 डिसेंबर : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 75 आठवड्यापर्यंत संबंधित सर्व विभागांनी आजादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमित सुतार, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. दूधे, तहसीलदार (सामान्य) यशवंत धाईत, जिल्हाधिकारी कार्यालय अधीक्षक प्रीती डुडूलकर तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख  उपस्थित होते.

जिल्ह्यातील संबंधित सर्व विभागांनी आजादी का अमृत महोत्सवाचे नियोजन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले,  उपप्रादेशिक परिवहन विभागाने पेट्रोल बचत करणे, रस्ते अपघातावर आळा घालणे त्यासंदर्भात जनजागृती करावी तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन आदी विषयांवर जनजागृती विषयक कार्यक्रम राबवावेत. महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम घ्यावे. कौशल्य विकास विभागाने युवक-युवतींना स्वयंरोजगारासंबंधी, मार्गदर्शन व रोजगार मेळाव्यांचे आयोजन करावे तसेच ग्रंथालय कार्यालयाने ग्रंथप्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करावे.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, संबंधित सर्व कार्यालयांनी आजादी का अमृत महोत्सवांतर्गत कशा पद्धतीचे उपक्रम राबवायचे आहे, त्याबाबतची माहिती घ्यावी. आयोजित कार्यक्रमाचे व्हिडिओ, माहिती व छायाचित्रे जिल्हा माहिती कार्यालयात पाठवावीत. यावेळी जिल्हाधिकारी यांनी या महोत्सवांतर्गत संबंधित विभागाकडून आतापर्यंत कोणकोणते उपक्रम राबविण्यात आले यासंबंधीची माहिती जाणून घेतली.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...