भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
- संतोष शिंदे, प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र
धनकवडी - 'आधार कार्ड' प्रत्येक नागरिकाच्या महत्त्वाचे आधारभूत कागदपत्र (डॉक्युमेंट) झालेले आहे. महाराष्ट्रात 'आधार कार्ड' ही लोकांची जीवनावश्यक गरज होऊन बसलेली आहे. लहान मुलांना शाळेच्या प्रवेशापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला आधारकार्ड गरजेचे आहे. बरेच नागरिकांनी आधार कार्ड काढली असली तरी त्यामध्ये पत्ता दुरुस्ती, नाव दुरुस्ती व इत्यादी दुरुस्ती चे प्रकार प्रलंबित आहेत. तसेच बऱ्याच नागरिकांनी किंवा त्यांच्या लहान मुलांनी नवीन आधार काड अजून काढलेले नाहीत. नवीन आधार कार्ड काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र सारखे सर्व सेंटर सध्या बंद आहे. त्यामुळे सुरू अषालेल्या एकाच केंद्रावर शहरातील इतर ठिकाणच्या नागरीकांचा अतिरिक्त भार पडत आहे. महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी आधार कार्ड काढले जातात, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेकडो च्या रांगा लागलेल्या असतात. क्षेत्रीय कार्यालयात महिन्याला १२० लोकांना लोकल स्वरुपात फॉर्म वाटले जातात. मात्र ते फॉर्म घेण्यासाठी ४०९ ते ५०० लोक रांगेमध्ये उभे असतात. 120 लोकांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर इतर लोकांना एक महिन्याची पुढची तारीख दिली जाते, त्यासाठी परत प्रतीक्षा करावी लागते, हे दुर्दैवी आहे. तर महिन्याला त्याच पद्धतीची गर्दी होत आहे.
धनकवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये महिन्याच्या एक तारखेला 120 लोकांना टोकन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात चारशे ते पाचशे नागरिक याठिकाणी लहान मुलांसह पहाटे सहा वाजल्यापासून रांगेमध्ये उभे असतात. टोकण संपल्यानंतर इतर लोकांना पुढची तारीख सांगितली जाते हे दुर्देवी आहे. राज्य सरकार व पुणे-नगर महानगरपालिकेने लोकांच्या गरजा लक्षात घेऊन आधार कार्ड सेंटर वाढवली पाहिजे अशी 'संभाजी ब्रिगेड'ची मागणी आहे.
सामान्य नागरिकांवर 'आधार कार्ड' चे भूत राज्य सरकार व केंद्र सरकारने बसवलेले आहे. पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी नगरसेवक मंडळी या गैरसोय व गर्दीकडे दुर्लक्ष करत असून, संपर्क केला तर उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. मात्र सेंटर कमी आहेत. नवीन आधार कार्ड काढण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी आधार कार्ड सेंटर वाढवावी किंवा महा ई सेवा केंद्र परवानगी द्यावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. कारण नवीन आधार कार्ड काढण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी शेकडो लोकांच्या रांगा लागलेल्या असतात आणि या लोकांकडे कुणाचेही लक्ष नसते हा दुर्दैवी प्रकार महाराष्ट्राच्या प्रत्येक शहर व जिल्ह्यात सुरू आहे म्हणून नवीन आधार कार्ड केंद्र सुरू करा. सध्या ही लोकांची गरज आहे.
सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक आमदार खासदार यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...