श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
कृषी विभाग तर्फे घरच्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी चे प्रात्यक्षिक संपन्न
वणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय वणी यांचे वतीने उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा श्री जगन राठोड यांचे मार्गदर्शनामध्ये शेतक-याकडील घरचे सोयाबीन बियाणे च्या उगवण क्षमता चाचणी चे प्रात्यक्षिक तालुक्यातील गावांमध्ये कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी घेतले.
घरचे सोयाबीन बियाणेच्या उगवण क्षमता चाचणी चे प्रात्यक्षिक घेताना सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता किती टक्के आहे, बियाणे पेरणी योग्य आहे कि नाही याबाबत शेतक-यांना प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उगवण क्षमता चाचणी चे प्रात्यक्षिक घेताना त्यामध्ये गोणपाट वापरून व वर्तमान पत्राचा कागद वापरून प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. प्रात्यक्षिक मधील बियाण्याची उगवण झाल्यानंतर किती टक्के बियाणे अंकुरले त्यानुसार एकरी किती बियाणे लागेल जसे कि सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के आली असेल तर एकरी ३० किलो बियाणे वापरावे. जर उगवण क्षमता ६९ टक्के असेल तर एकरी ३०.५ किलो बियाणे वापरावे, जर उगवण क्षमता ६८ टक्के असेल तर एकरी ३१ किलो बियाणे वापरावे, या प्रमाणे १ टक्के उगवण क्षमता कमी आली असल्यास ०.५ किलो बियाणे जास्त प्रमाणात वापरावे, कमीत कमी ६० टक्के पर्यंत उगवण झालेले बियाणे पेरणी करीता वापरू शकतात. शेतक-यांनी ६० टक्के पेक्षा कमी उगवण झालेले सोयाबीन बियाणे पेरणी करीता वापरू नये.
अशा प्रकारे तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये घरचे सोयाबीन बियाणेच्या उगवण क्षमता चाचणी चे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सर्व शेतक-यांनी घरचे सोयाबीन बियाण्याची व कृषी सेवा केंद्रातून विकत आणलेल्या बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करून व बियाण्यास बीज प्रक्रिया करूनच पेरणी करिता बियाणे वापरावे. अधिक माहिती करिता गावचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालय वणी कडून करण्यात येत आहे.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...