वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
लातूर (नवनाथ रेपे) : राज्य सयकारने सर्व नियम सिथिल करत शाळा महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला पण सरकार शाळा व महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थांना लसीकरण सक्तीचे केले जात असून जे विद्यार्थी वँक्सीनचे दोन डोस घेणार नाहीत त्यांना शाळा महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही प्रसारमांध्यमांच्या माध्यमातून सरकार व शाळा महाविद्यालयातील मुख्याध्यापक प्राचार्य यांचेकडून यांचेकडून काढल्या जात असून त्यामुळे संविधानाने जो शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिला आहे त्याचे हनन होत असल्याकारणामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने देशभरातील ५५० जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्याच्या मुख्यमत्र्यांना निवेदन दिले शिवाय भारतीय विद्यार्थी मोर्चा लातुरच्या वतीने लातुर मनपा आयुक्तांना यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांना भारतीय विद्यार्थी मोर्चाचे बंडूसिंग भाट यांनी दिले.
राज्य सरकारने शाळा महाविद्यालयात प्रवेश केवळ दोन डोस घेतलेल्यानाच मिळेल अशा प्रकारचे परिपत्रक काढल्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या ह्या निवेदनात म्हटले की, लसीकरण बंधनकारक आहे असे केंद्र सरकार व केद्रींय आरोग्य मंत्रालयाने कुठेही म्हटले नाही तसेच सर्वोच्च न्यायालय व अनेक राज्याच्या न्यायालयाचे आदेश आहेत की, कोवीड १९ लसीकरण बंधनकारक नाही ते एच्छिक आहे जर बंधनकारक करणार असतील तर नागरीकांच्या मुलभूत अधिकाराचे हनन होणार आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चा सुचित करते की, बंधनकारक केलेले लसीकरण तात्काळ प्रसाशनाने रोखावे.
तसेच भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या म्हणजे लसीकरण बंधनकारक असल्याचा आदेश दाखवावा किंवा तो भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या मेल आयडीवर पाठवावा. लसीकरण केल्यास कोरोना होणार नाही यांची शाश्वती आहे ? असेल तर सरकारने तसे लिखित स्वरूपात द्यावे. जर लसीकरणामुळे एखादा विद्यार्थी मरण पावल्यास त्याची सर्वस्वी जिम्मेदारी सरकारची असेल असे सरकारने लिखित द्यावे. प्रशासकीय यंत्रणेकडून जे वँक्सीन बंधनकारक केल्या जात आहे त्यात नेमके कुठले घटक आहेत हे सरकारने लिखित द्यावे. अन्यथा बंधनकारक केलेले हे लसीकरण तात्काळ रद्द करावे व नागरिकांच्या मुलभूत अधिकाराचे जतन करावे. जर सरकारने हे लसीकरण रद्द केले नाही किंवा आमच्या वरील मागण्या मान्य केल्या नाहीत तर भारतीय विद्यार्थी मोर्चा संपुर्ण देशभर कोवीड १९ च्या लसीकरणाविरोधात राष्ट्रव्यापी बहिष्कार अंदोलन करेल असा इशाराही निवेदनात दिला आहे.
सदरील निवेदन लातुरच्या मनपा आयुक्तांना देताना दत्ता करंजीकर जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी, बडुसिंग भाट जिल्हा सचिव बहुजन मुक्ती पार्टी, प्रकाश लेनेकर, कपील धावड, अभिजित लखमशेट्टे, गंगाराम घोटमुकळे व दै. समिक्षाचे लातूर शहर प्रतिनिधी नवनाथ रेपे हे उपस्थित होते.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...