मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
सुरज तलमले (ब्रम्हपुरी) : प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ' नवी मुंबई ' चे निर्माते तथा सिडकोचे शिल्पकार ' हरितक्रांतीचे प्रणेते ' वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देने बाबत सदर निवेदन सुदाम भाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविले.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, कृषी-औद्योगिक क्रांतीचे जनक,नवी मुंबईचे निर्माते तथा सिडकोचे शिल्पकार.वसंतराव जी नाईक यांचे कर्तुत्व राज्यासह देशालाही गौरवनित करणारे आहे.महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करीत असताना त्यांनी मोठ्या दूरदृष्टीने नवी मुंबईची पाया भरणी व उभारणी केली.तात्कालिन विरोधी पक्षांनि नव्या मुंबईचा निर्मितीचा प्रचंड विरोध दर्शविला होता, तरी दूरदृष्टी असणारे "विकासाचे महानायक" वसंतराव जी नाईक साहेब यांनी नवी मुंबई उभारली.हे देशभर सर्वसृत असताना त्यांच्या या अद्वितीय कार्याच्या सन्मानार्थ नवी मुंबई विमानतळाला वसंतराव जी नाईक साहेब यांचे नाव देने अतिशय समर्थक आणि उचित ठरेल.
आधुनिक महाराष्ट्राला घडविणाऱ्या नाईक साहेबांच्या सन्मानार्थ भरीव आणि ऐतिहासिक असे आजवर असे काहीही दिसून आले नाही हे दुर्दैवी आहे, वसंतरावजी नाईक साहेब यांचे जन्म शताब्दी वर्ष अंतर्गत प्रस्तावित अनेक बाबी आजही प्रलंबित आहे, हे अतिशय खेदाने असे म्हणता येईल,सद्या सुरू असलेल्या नवी मुंबई विमानतळ नामकरनाच्या वादावरून नवी मुंबई निर्मात्याचेच नाव डावलून इतर लोकांचे नाव पुढे केले जात आहे, याबद्दल नाईक साहेबांचे अनुयायांत,ओबीसी मागासवर्गीय,बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थथा आहे. येत्या १ जुलै रोजीच्या कृषी दिन (वसंतराव नाईक जयंती) या पावन पर्वावर नाईक साहेबांच्या नावाने याबाबतीत घोषणा व निर्णय होतील अशी आपणाकडून अपेक्षा आहे.
तरी कृपया नवी मुंबईचे निर्माते तथा सिडकोचे शिल्पकार असलेले वसंतराव नाईक साहेब यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देऊन त्यांचे " वसंतरावजी नाईक नवी मुंबई विमानतळ" असे नामकरण करण्यात यावे. अशी मागणी सुदामभाऊ राठोड विदर्भ राज्य युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांनी निवेदन पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...
*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...