आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मारेगाव: तालुक्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेल्या सुप्रसिद्ध अशा बोरी (बु) गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पक्का पांदनरस्ता नसल्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून चिखलातून पायवाट काढून शेतात जाण्यासाठी मार्गक्रमन करावे लागत आहे. बोरी (बु) हे गाव पंचक्रोशीत 'बोरी गदाजी' आणि 'बोरी गोटमार' या नावाने ओळखले जाते. या गावी सुप्रसिद्ध असे श्री संत गदाजी महाराज यांचे मंदिर आहेत. दरवर्षी होळीनिमित्त या गावी भव्य दिव्य अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गोटमारीचे आयोजन केल्या जाते,तसेच यात्रा सुद्धा भरविण्यात येते. एकंदरीत गावाला भरभरून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभल्याचे दिसून येत असताना या गावातील शेतकऱ्यांना मात्र शेतात जाण्यासाठी पक्का पांदण रस्ता नसल्याने अतिशय बिकट परिस्थिती ला सामोरे जावे लागत आहेत. गावातील 95 टक्के लोकांचा शेती हा व्यवसाय आहेत. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. परंतु पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी पक्का पांदण रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना शेतात शेतीचे अवजारे, खते, बी -बियाने तसेच मजूर सहकारी यांना शेतात नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहेत. या गावात 4-ते 5 पांदनरस्ते आहेत आणि सर्वच्या सर्व रस्ते हे पावसाळ्यात चिखलाने माखले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात बैलबंडी सुद्धा घेऊन जाता येत नाही. जनावरांचे पाय चिखलात गढतात त्यामुळे त्यांना शेतमालाची ,शेती अवजारांची वाहतूक सुद्धा करता येत नाही.
जर शासनाने पालकमंत्री पांदण रस्ते या योजने अंतर्गत गावातील शेतकऱ्यांना पांदनरस्ते बांधून दिले तर शेतकऱ्यांना शेतात जाणे सोयीस्कर होईल. याच मागणीसाठी बोरी येथील शेतकऱ्यांनी सरपंच श्री प्रवीण नांने यांच्या नेत्रत्वात आज मा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पक्के पांडनरस्ते बांधून देण्यासाठी त्यांच्या वणी येथील निवासस्थानी जाऊन निवेदन दिले.मा आमदारांनी लवकरात लवकर बोरी(बु) येथील शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी आशा सर्व शेतकऱ्यांनी बाळगली आहेत. निवेदन देण्यासाठी प्रवीण नांने(सरपंच), प्रदीप साबरे (उपसरपंच), सुनील पिंपलकर, दादाजी वडे, वामनराव नाने,ज्ञानदेव साबरे, मंगेश साबरे, बंडू नाणे, उत्तम नाणे,कुंडलिक वाकडकर, सादू काळे, रामकिसन करडे, हुसेन करडे, गणेश बोबडे, कवडू मिलमिले, रामचंद्र हुलके, आकाश साबरे इत्यादी उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...