वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी:- आशिया खंडातील सर्वात मोठी सिमेंट फॅक्टरी आरसीसीपीएल ही एम पी बिर्ला च्या नावावर सुरू होण्याच्या मार्गावर आहे. सिमेंट फॅक्टरी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना विविध प्रलोभने देऊन कवडीमोल भावात शेतीची खरेदी केली. कंपनीचे बांधकाम जवळ जवळ दोन वर्षांपासून सुरू असून मार्च २०२२ पर्यंत कम्पनी सुरू होण्याच्या मार्गावर आली असून आतापर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या एकही नातेवाईकाना कंपनीत नौकरिवर घेण्यात आले नाही. याबाबत कंपनीला अनेकदा निवेदने देऊन सुद्धा एकही मुलाला नौकरीवर सामावून घेण्यात आले नाही. अखेर त्रस्त शेतकरी यांनी कंपनीच्या मुख्य गेटवर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला व त्याबाबत जिल्हाधिकारी, कंपनीसह इतर सर्व अधिकारी यांना निवेदन देऊन ३० डिसेंबर पासून धरणे आंदोलनास सुरवात करण्यात आली.
कंपनीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नौकरीवर सामावून घेण्याबाबत अनेकदा बैठका घेण्यात आल्या व निवेदने देण्यात आली परंतु कंपनी कडुन कोणताही तोडगा न निघाल्यामुळे तसेच कंपनीला दिलेल्या निवेदनाचे उत्तर लेखी स्वरुपात न कळविल्यामुळे व कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कंपनी विषयी रोष निर्माण झाला. कंपनीला ७ दिवसाचा अल्टीमेंटम देण्यात आला होता. कंपनीने ७ दिवस होऊन सुध्दा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आज पर्यंत लेखी स्वरुपात काहीच कळविले नाही तसेच मागील ४ महिन्याच्या कालावधीत कंपनीला निवेदन देऊन व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांविषयी नौकरी बाबत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ३० डिसेंबर पासून धरणे आंदोलनाला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत पर्यंत धरणे आंदोलन सुरु राहणार आहे त्यात तोडगा न निघाल्यास बेमुदत उपोषण व वेळ प्रसंगी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिनेश बर्लावार,गणपत बच्चेवार,मनोज अकीनवार,गोपाल एनगंधेवार, राजेश बोलीवार,संभा पारशिवे, अनिल दुर्लवार, पुरुषोत्तम खीरटकर, गजानन बच्चेवार,भुदेवी चेलपेलवार,खलील खा पठाण,मोरेश्वर कोलमपेल्लीवार,राजेश डब्बावार, सुमित अकीनवार,आकाश कोलमपेल्लीवार,ऋषिकेश पुल्लीवार, सह सर्व शेतकऱ्यांनी दिला.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...