Home / महाराष्ट्र / दिपालीची आत्महत्या...

महाराष्ट्र

दिपालीची आत्महत्या प्रशासकीय व्यवस्थेचा बळी

दिपालीची आत्महत्या प्रशासकीय व्यवस्थेचा बळी

प्रकरणाची CID मार्फत चौकशी करा, कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती महाराष्ट्र आणि बेलदार समाज वणी संघटनांची मागणी

 वणी :- हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण हा प्रशासकीय व्यवस्थेचा बळी आहे. या प्रकरणात वनविभागातील आर्थिक घबाड कारणीभूत आहे. त्यामुळे या प्रकरणी CID चौकशी करून उपवनसंरक्षक शिवकुमार व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आज (ता ३१) कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती महाराष्ट्र तथा बेलदार समाज बहूउद्देशीय संस्था वणी यांनी उपविभागीय अधिकारी वणी मार्फत निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, प्रधान सचिव, वनविभाग, राज्य महिला आयोग, पालकमंत्री अमरावती, प्रधान मुख्य वनसंरक्षक, पोलीस अधीक्षक अमरावती, राज्यमंत्री वनविभाग यांना पाठविण्यात आला.

हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी व युवा ओबीसी तरुणी दीपाली चव्हाण यांना डिएफओ विनोद शिवकुमार वनविभागातील आर्थिक गैरव्यवहारासाठी मानसिक व शारीरिक त्रास देत होते. वनप्रशासन लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने दिपाली परिसरात कार्य करीत असल्याने त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. गर्भवती असताना तब्बल तीन किलोमीटर जंगलात चालविल्यामुळे त्यांचा गर्भपात झाला. 

वनविभागातील तस्करांना लगाम घालण्यासाठी उचलेले धाडसी पाऊल वरिष्ठांना खुपले असल्याने DFO विनोद शिवकुमार यांनी त्यांचा अन्ववीत छळ केला. या प्रकरणाची तक्रार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना वारंवार करण्यात आली. मात्र रेड्डी यांनी याकडे दुर्लक्ष करून उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना पाठबळ देऊन महिला अत्याचारात आपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नोंदविला. आत्महत्या करण्यापूर्वी दुर्दैवी दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सर्व घटनाक्रम नमूद केला आहे. या संपूर्ण प्रकरणात दोषी असलेल्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार व रेड्डी यांना सेवेतून बडतर्फ करीत त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,  मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील सहभागी सर्व व्यक्तींचा आरोपी म्हणून सहभाग निश्चित करावा, या प्रकरणाची शासनाने CID मार्फत चौकशी करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी बांधवांतर्फे तिव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती महाराष्ट्र, बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी, संघर्ष वाहिनी नागपूर यांनी दिला आहे.

यावेळी बेलदार समाज बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रदिप बोनगिरवार, नगरसेवक राकेश बुग्गेवार, संस्थेचे उपाध्यक्ष तथा कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समितीचे प्रचारक गजानन चंदावार, संस्थेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर बोनगिरवार, भगवान मोहिते, राकेश बरशेट्टीवार, विशाल बोरकुटवार आणि प्रवीण येलपूलवार आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...