Home / आरोग्य / म्युकरमायकोसिस साथीचा...

आरोग्य

म्युकरमायकोसिस साथीचा आजार म्हणून घोषित

म्युकरमायकोसिस साथीचा आजार म्हणून घोषित

आजाराच्या माहितीसाठी नोडल अधिकारी नियुक्त

चंद्रपूर दि.24 मे: कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने म्युकरमायकोसिस हा आजार साथीचा रोग म्हणून घोषित केलेला आहे.

19 मे 2021 रोजी म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये करण्यात आलेला असून या आजाराला साथीचे रोग म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे साथीचे रोग नियंत्रण कायद्याचे सर्व नियम या आजाराला लागू राहील.
त्यासोबतच सदर आजाराचे संशयित रुग्ण आणि त्यांच्यावर निदान करणाऱ्या डॉक्टरांनी अथवा रुग्णालयांनी जिल्हा प्रशासनाला न कळविण्यास त्यांचेवर साथरोग नियंत्रण कायदा 1897 अंतर्गत कार्यवाही केल्या जाईल अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.

यावेळी सदर बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुमित भगत उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण शासकीय अथवा खाजगी रुग्णालयांमध्ये आढळल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कंट्रोल रूमला त्वरित माहिती कळविणे आवश्यक आहे. तसेच सदर आजाराच्या नियंत्रणासाठी व माहितीसाठी डॉ. कासटवार व डॉ. मेश्राम या डॉक्टरांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले की , एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांना म्युकरमायकोसिस या आजाराबाबत सर्जरी करावयाची असल्यास तज्ञ डॉक्टरांची टीम असणे आवश्यक आहे. यामध्ये डोळे सर्जन, ई.एन.टी सर्जन, जनरल सर्जन, न्यूरोसर्जन, डेंटल मॅक्झिलो फेशीयल सर्जन आणि अॅम्फोटेरिसीन- बी मेडिसिन असणे गरजेचे आहे. रुग्णालयाकडे कोणतेही रुग्ण संशयित असेल अथवा निदान झालेले असतील तर त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला सूचित करावे. तसेच mucormycosischandrapur@gmail.com या ई-मेलवर किंवा नोडल अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

आरोग्यतील बातम्या

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक) मो.९७६२६३६६६२ कोरोना या बनावट...

सोमवारी जिल्ह्यात 12 कोरोनामुक्त तर 1 बाधित ।। ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 130

चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...

शुक्रवारी जिल्ह्यात 116 कोरोनामुक्त तर 63 नवे बाधित

चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...