वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी):- संपुर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी राज्यातील शेतकरी देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट ५० हजार रुपयांची मदत वर्ग करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.अन्यथा संभाजी ब्रिगेड चंद्रपूर ने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याचा अंदाज चुकवत दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमालीचा पडला आहे. त्यात सप्टेंबरमध्ये पाऊस तसा अत्यल्प पडतो. पण यावर्षी सप्टेंबरमध्ये कमालीचा पाऊस पडला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कपाशी,तूर यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेल्या सोयाबीन ला तर कोंब फुटले आहे. तर काही शेतातील सोयाबीन जमिनीवर पडले असल्याचे स्पष्ट चित्र ही बघायला मिळते आहे. कपाशीचे जोमात आले होते.बोंडे सुद्धा लागली होती.परंतु सततच्या पावसाने बोंडे सुद्धा करपली आहेत. परिणामी निसर्गाच्या आपत्तीमुळे घरात पीक येण्यापूर्वीच उध्वस्त झाले आहे. या महिन्यात पडलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने वणी उपविभागासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट ५० हजार रुपये मदत तात्काळ वर्ग करण्याच्या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, महानगराध्यक्ष अँड मनीष काळे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सचिन बोधाने, जिल्हासचिव गजानन नागपुरे, प्रसिद्धी प्रमुख इंजि. प्रकाश पिंपळकर आदींनी निवासी उप जिल्हाअधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. अन्यथा संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावर्षी शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनचे पीक डोलायला लागले होते. तसाच बाजारपेठेत सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल १० हजार रुपयांच्या घरात गेले होते. जसा हंगाम सुरू झाला तसे केंद्र सरकारने सोयाबीनपेंड आयात केली.आणि सोयाबीनचे दर निम्यावर आले. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी संकट अशा कचाट्यात शेतकरी अडकला आहे. आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जणू जीवावरच उठल्याचे आयात धोरणावरून स्पष्ट होत आहे. आता झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी, पुरता हवालदिल झाला आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...