वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
बल्लारशाह : स्थानकात कार्यरत दक्षिण आरपीएफच्या ताब्यात चोरीचा आरोपाखाली असलेल्या राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे राहणारा अनिल गणपत मडावी (२९ ) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडीस आली आहे. आरपीएफच्या ताब्यात असलेल्या युवकाचा मृत्यू कसा झाला? कोणी मारलं? किंवा कोणत्या रोगाने मृत्यू झाला का? हे सीआयडीच्या चौकशीनंतर या रहस्यावरून पडदा उठणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील अनिल गणपत मडावी यास सुमारे पंचवीस हजारांच्या तांबे केबल चोरीच्या प्रकरणात सोमवारी दुपारी आणण्यात आले होते. सोमवारी रात्री ८.०५ वाजता तो आरपीएफच्या चौकीमध्ये हाताच्या दुखापतीने बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. त्याला तातडीने बल्लारपूर येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र इथल्या डॉक्टरांनी त्यांना गंभीर पाहून चंद्रपूर दवाखान्यात रेफर केले. चंद्रपूरच्या डॉक्टरांनी रात्री १० वाजता अनिल मडावी यांना मृत घोषित केले.
मृतकाच्या कुटुंबीयाने सांगितले कि रात्री १० च्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. आपल्या तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहेत. आमचा मुलगा मागील पाच दिवसापासून दिसला नाही. तो कुठे होता. हे माहीत नाही. आम्ही त्याचा शोध घेत होतो. मात्र, विरुर रेल्वे पोलिसांकडून आधी आम्हला कुठलीही माहिती दिली नाही. याबाबत उचस्तरीय तपास करण्यात यावा अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येत आहेत.
तेलंगणा राज्यातील आरपीएफ पोलीस स्टेशन सिरपूर कागजनगर येथे असून बल्लारशाह येथे चौकी असून दक्षिण रेल्वेच्या मालमत्तेची हानी आणि चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम दक्षिण आरपीएफ करते. आज या दक्षिण आरपीएफच्या चौकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविद साळवे, बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश पाटिल यांनी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची चौकशी सीआयडीच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहेत.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...