Home / महाराष्ट्र / मनपा चंद्रपुर द्वारा...

महाराष्ट्र

मनपा चंद्रपुर द्वारा कोविड-19 बाधित कचऱ्याच्या हलगर्जी व्यवस्थपणामुळे चंद्रपुर मनपा च्या कंत्राटी कामगारां सोबत सामान्य माणसाच्या जीवाला धोका :- सुनील रत्नाकर भोयर; संघटनमंत्री आप चंद्रपुर

मनपा चंद्रपुर द्वारा कोविड-19 बाधित कचऱ्याच्या  हलगर्जी व्यवस्थपणामुळे चंद्रपुर मनपा च्या कंत्राटी कामगारां सोबत सामान्य माणसाच्या जीवाला धोका :- सुनील रत्नाकर भोयर; संघटनमंत्री आप चंद्रपुर

चंद्रपूर (प्रतिनिधी) :- चंद्रपुर मनपाचे घंटागाडी घेऊन कचरा गोळा करणारे कंत्राटी कामगार नेहमीप्रमाणे आपले काम करीत आहेत. पण सध्याच्या कोव्हीड19 च्या दुसऱ्या लाटेतील महामारीमुळे बाधित झालेले रुग्ण व मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांना वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या हाईजिनिक उपकरणाचा कचरा,औषधांची पॅकेट कचरा,इंजेक्शनची खाली बोटल्सचा कचरा,स्लाईनचा कचरा,बोटल्स,पॅड कचरा, हॅन्डग्लोज कचरा,वापरलेल्या प्लास्टिक नळ्यांचा कचरा,वापरलेल्या PPE किट्स कचरा अशा सर्व प्रकारचा खाजगी कोविड19 व शासकीय कोविड19 रुग्णालयातील बाधित कचरा ... चंद्रपुर मनपाच्या दैनंदिन कचरा उचलणार्या गाड्यांमध्येच वाहून नेण्यात येत आहे हे महत्त्वाचे कोविड19 च्या बाधित रुग्णांचा कचरा वाहून नेण्यासाठी वेगळ्या प्रकारची गाडी वापरणे आवश्यक होते. पण उपरोक्त प्रकारचा सर्व कचरा डम्पिंग यार्ड मध्ये जमा केल्या जात आहे व तेथे भंगार जमा करणारे लोक,मोकाट जनावरांचा त्या कचऱ्याला स्पर्श होऊन ही लोक व जनावरे जनमानसात फिरत आहेत यामुळे सुद्धा कोविड19 च्या बाधितांची संख्या वाढन्याची शक्यता नाकारता येत नाही. कामगारांना सुद्धा सुरक्षा कवचाची व्यवस्था करून देणे गरजेचे होते. पण आयुक्त,महापौर चंद्रपुर मनपा चंद्रपुर ,बसलेले सत्ताधीश नगरसेवक यांनी ही व्यवस्था करणे आवश्यक होते. पण  चंद्रपुर मनपा तील भोंगळ कारभारामुळे या दैनंदिन कचरा गोळा करणाऱ्या कामगारांचे जीव धोक्यात टाकण्यात येत आहे. 

या कामगारांच्या जीविताला धोका पोहचू नये म्हणून आणि काम करतांना एखाद्या कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराची आर्थिक स्थिती रुळावर राहावी म्हणून आम आदमी पार्टी चंद्रपुर चे संघटनमंत्री श्री सुनील रत्नाकर भोयर तसेच झोन 2 चे संयोजक श्री संदीप तुरक्याल आम्ही कोणत्याही कामगारांचें नाव न घेण्याच्या शर्तीवर खालील मागण्या आयुक्त, महापौर, मनपा चंद्रपुर यांना खालील मागण्यांचे निवेदन करीत आहोत.

1) कोविड19 चा कचरा उचलण्यासाठी दैनंदिन गाड्या न वापरता वेगळ्या गाड्यांची व वेगळ्या कामगारांची व्यवस्था करण्यात यावी.
2) कचरा गोळा करणार्या कंत्राटी कामगारांना संपूर्ण सुरक्षा किट देण्यात यावी.
3) संपूर्ण साफसफाई व  व कचरा उचलणार्या रेग्युलर व कंत्राटी कामगारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी रुपये 25 लाखाचा विमा सुरक्षा कवच देण्यात यावे.
4) आणि शेवटी या सर्व साफसफाई व घंटागाडी कामगारांचे कायद्याने ठरविण्यात आलेले रुपये 15,000 ते 19,000 पर्यन्तचे पगार रेग्युलर देण्यात यावे.
  असे न झाल्यास आम आदमी पार्टी चंद्रपुर पक्ष्याचे संघटनमंत्री श्री सुनील रत्नाकर भोयर यांचे  मार्गदर्शन व नेतृत्वाखाली  उपरोक्त मागण्यां पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. असे पक्षाचे मीडिया प्रमुख श्री राजेश चेडगूलवार यांनी कळवले आहे. याप्रसंगी पक्षाचे श्री अजय डुकरे,श्री अशोक आनंदे,श्री राजू कुडे, श्री. सुखदेव दारुनडे ,श्री सिकंदर सांगोरे, श्री योगेश आपटे,श्री बबन कृष्णपल्लीवार,सौ देविका देशकर जोशी, सौ वर्षा सुनील भोयर,सौ वैशाली डोंगरे, श्री विनोद कुडकेलवार,श्री अवेज शेख, श्री शाहरूख शेख,श्री गिरीश राऊत, श्री भुवनेश्वर निंमगडे,श्री बशीर भाई पठाण ,श्री मधुकरराव साखरकर आणि श्री वामनराव नांदूरकर इत्यादींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...