Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / राजूर ग्रा.पं.च्या मासिक...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

राजूर ग्रा.पं.च्या मासिक सभेला सदस्यांची दांडी

राजूर ग्रा.पं.च्या मासिक सभेला सदस्यांची दांडी

कोरम अभावी मासिक सभा रद्द

राजूर कॉलरी : तालुक्यातील मोठी ग्रापं व औद्योगिक क्षेत्र असलेल्या राजूर ग्रापं मध्ये मात्र हवसेनवसे ग्रापं सदस्यांमुळे गावातील विकास कामांना खीळ बसत असल्याचे चित्र दिसत आहे. दर महिन्याला होणाऱ्या ग्रापं च्या मासिक सभेला फार महत्व असते. गावातील विकासकामा संदर्भात अनेक ठराव घेऊन गावाचा विकास करायचा असतो. मात्र या मासिक सभेत निवडून आलेले ग्रापं सदस्यच गैरहजर राहून दांडी मारत असतील तर गावाचा विकास कसा होणार, हा प्रश्न निर्माण होतो आहे. 

दहा हजाराचे वर लोकसंख्या असलेली व १७ सदस्यीय असलेल्या राजूर ग्रापं ला दरवर्षी कोटी रुपयांचा निधी येत असतो. त्यातल्या त्यात तीन हजारापेक्षा जास्त घरे व चुना भट्ट्या व कोळसा खान  असल्याने मोठ्या प्रमाणावर कर सुद्धा जमा होत असतो. त्यामुळे राजूर ग्रापं ही कोटी रुपयांचे उलाढाल करणारी ग्रापं आहे. असे असतानाही गावातील विकास कामे व्हायला पाहिजे त्या अनुरूप होत नसल्याने खेडे गावातील विकास कामासमोर राजूर ची अवस्था लाजिरवाणी दिसते. अजूनही गावात रस्ते, नाल्या, प्रदूषण, नाल्या साफसफाई, पथदिवे, नळयोजनेची तारांबळ, कचरा विल्हेवाट, आदी समस्या आ वासून उभ्या ठाकल्या आहेत. 

अशी गावाच्या विकासाची बिकट परिस्थिती असताना मात्र ग्रापं सदस्य दर महिन्याला विकासाची योजना करून विकासाला पुढे नेण्या ऐवजी होणाऱ्या मासिक सभेलाच दांडी मारत असल्याने मासिक सभाच तहकूब करावी लागत आहे. उपस्थित असणाऱ्या ग्रापं सदस्यांना खाली हातांनी परत जावे लागत आहे. १७ सदस्यांमधून ९ सदस्य असल्याखेरीज कोरम पूर्ण होत नसल्याने ग्रामसेवकासमोर मासिक सभा तहकूब करण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. या ठिकाणी असेही पाहायला मिळत आहे की, काही सदस्य निव्वळ बुकावर सही मारून निघून जातात, त्यांना ग्रामविकासाशी व घेण्यात येणाऱ्या ठरावाशी आणि होत असलेल्या चर्चेशी काहीच देने घेणे नाही. 

हा प्रकार पूर्णपणे येथील विकासाला खीळ घालण्याचा आहे. मासिक सभेला ग्रापं सदस्यांची उपस्थिती नसणे ह्याला सत्ताधारी व विरोधक दोन्ही सारखेच जवाबदार आहेत. दोन्ही बाजूचे सदस्य गैरहजर असतात. ज्यांना गावाचा विकासाशी काहीही देणेघेणे नाही असे हवसेनवसे लोकप्रतिनिधी बनत असतील तर विकासाची गंगा वाहणारच कशी? हा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...