Home / चंद्रपूर - जिल्हा / रक्‍तदान करून सामाजिक...

चंद्रपूर - जिल्हा

रक्‍तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासा –राखी कंचर्लावार

रक्‍तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासा     –राखी कंचर्लावार

मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे रक्‍तदान शिबीराचा शुभारंभ

चंद्रपूर: कोरोनाच्‍या संकटामध्‍ये रक्‍ताची गरज असणा-या रूग्‍णांची हेळसांड होत आहे. त्‍यातच आपल्‍या जिल्‍हयाची स्थिती आणखी गंभीर आहे. या जिल्‍हयात सिकलसेल व थॅलेसेमीया चे रूग्‍ण असल्‍याने ही गंभीर स्थिती आहे. या रूग्‍णांना रक्‍ताशिवाय दुसरा पर्याय नाही. कोरोनाच्‍या संकटात रक्‍तदात्‍यांची संख्‍या कमी झाल्‍याने हे रूग्‍ण रक्‍तासाठी भटकत आहेत. त्‍यामुळे नागरिकांनी रक्‍तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासावी असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले. त्‍या आय.एम.ए. सभागृह येथे मोदी सरकारच्‍या सप्‍तवर्षीपुर्तीनिमीत्‍त आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे आयोजित रक्‍तदान शिबीराच्‍या शुभारंभप्रसंगी रविवार (३० मे) ला कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्ष म्‍हणून बोलत होत्‍या. यावेळी प्रमुख अतिथी म्‍हणून भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती अध्‍यक्ष रवि आसवानी, आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारचे राजेंद्र गांधी, सुभाष कासनागोट्टूवार, रविंद्र गुरनुले, प्रकाश धारणे, संजय कंचर्लावार, भाजपा मंडळ अध्‍यक्ष सचिन कोतपल्‍लीवार, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, रामकुमार अकापेल्‍लीवार, स्‍वेच्‍छा रक्‍तदान शिबीर प्रकल्‍प संयोजक प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. याप्रसंगी प्रकाश धारणे, शुभम शेगमवार, विवेक कुलकर्णी, कमलेश नंदनवार, वैष्‍णवी अडावदकर यांनी रक्‍तदान केले.

           कंचर्लावार म्‍हणाल्‍या, रक्‍तदानामुळे आपण अनेकांचा जीव वाचवू शकतो. मानवी शरीरातच रक्‍त तयार होत असल्‍याने नागरिकांनी जागरूकपणे रक्‍तदान केले पाहीजे. याप्रसंगी डॉ. गुलवाडे यांनी रक्‍तदानाचे महत्‍व विषद करीत हे शिबीर पुढील ३० दिवस अविरत सुरू ठेवण्‍याचे जाहीर केले. मागील वर्षी महानगरातील विविध संघटनांनी या सेवायज्ञात सहभाग नोंदविला होता, असेही ते म्‍हणाले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात सुभाष कासनागोट्टूवार  यांनी आयोजनामागचा उद्देश विशद केला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांनी केले तर आकापेल्‍लीवार यांनी आभार मानले. रक्‍त संकलनासाठी जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयातील डॉ. मृदुल खोब्रागडे व समाजसेवा अधिक्षक पंकज पवार यांच्‍या चमूने महत्‍वाची भूमीका बजाविली.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...