आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन सुरू केले. त्यातुन त्यांनी प्रखर व सत्यवादी लेखणीतुन महाराष्ट्राची वैचारिक मशागत केली. त्यांना प्रबोधनकार म्हणुन ओळख मिळाली. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने प्रबोधनकारांच्या विचाराला व ईतरही गौत्तम बुद्ध ते जिजाऊ, शिवराय, फुले, शाहु, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संविधान या विचाराचा जागर व्हावा म्हणुन प्रबोधनकारांचा जन्मदिवस महाराष्ट्रभर 'लोकप्रबोधन दिन' म्हणुन साजरा करण्याचे आव्हान संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी आव्हान केले.
त्या निमित्याने मुकूटबन येथे बुधवारी ( दि. 21) रात्री प्रसिद्ध विनोदी प्रबोधनकार, सप्तखंजेरी वादक नयन मडावी यांच्या संगीतमय विनोदी प्रबोधनाचा कार्यक्रम संभाजी ब्रिगेड व शिवसेना झरी यांच्या वतीने मुकूटबनात पार पडला.
प्रबोधनकर नयन मडावी यांनी संगीताच्या माध्यमातून लोकांना अंधश्रद्धा आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचा संदेश दिला. संविधानातून मिळालेले अधिकार स्पष्ट करा. जातिभेद, विषमता दूर करून बंधुता आणि मानवतेने जगण्याचा संदेशही त्यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनसामान्यांपर्यंत नेण्याबाबत त्यांनी सांगितले. तरुणांनी शिक्षित होऊन समाज आणि देशहितासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुकुटबन येथील आदर्श हायस्कुल शाळेच्या पटांगणावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होती.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक संतोष माहुरे विधानसभा अध्यक्ष शिवसेना, अध्यक्ष चंद्रकांत घुगुल, तालुकाध्यक्ष शिवसेना, तर प्रमुख पाहुणे म्हणून अमोल टोंगे विधानसभा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, केतन ठाकरे तालुकाअध्यक्ष मराठा सेवा संघ, आशिष झाडे तालुकाअध्यक्ष संभाजी ब्रिगेड, संदीप विच्चू उपसभापती कृ.उ.बा.स. मुकुटबन, निलेश बेलेकर युवासेना, दत्ता दोहे संभाजी ब्रिगेड, मीनाताई आरमुरवार सरपंच मुकुटबन, अशोक पानघाटे, देव येवले, नितेश ठाकरे, संदीप आसूटकर, राजू आसुटकार, विनोद उप्परवार, बाळूभाऊ बरशेट्टीवार, सचिन टोंगे, राजू लोडे, सीताराम पिंगे, राहुल राजूरकर, गजभिये सर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वडके सर, प्रस्तावना शुभम राऊत, तर आभार प्रदर्शन पथाडे सर यांनी पार पाडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय पानघाटे, प्रतीक राजूरकर, सुरेश निब्रड, संदीप धोटे, रोहित चव्हाण, अनिकेत टोंगे, विनोद गद्दमवार, प्रशिक बरडे, अनिकेत बांदूरकर, राहुल राजूरकर, शंकर झाडे, अशोक पानघाटे, सुरज सोनकर, संदीप येवले, सुमित क्षीरसागर, दीपक हिरादेवे, विवेक सोनटक्के, शुभम राऊत, राजू झाडे, छंदक तेलंग, राहुल चव्हाण, राहूल बत्तावर, सचिन दाणे, संतोष लेडांगे यांनी परिश्रम घेतले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न...
हर्षपाल खाडे (पांढरकवडा): केळापूर येथील जगदंबा संस्थान येथे कर्मचारी अपंग प्रकाश बिजाराम करलुके वय 48 वर्षे याला...