शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
वणी : उप विभागातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. यात संपूर्ण मानव जात धोक्यात आली आहे. त्यांना वाचविण्यासाठी महसूल प्रशासनाने गाव तिथे कोरोना बाधित रुग्णासाठी विलगीकरण केंद्र ही संकल्पना राबविन्यात यावी जनेकरून कोविडचा प्रसार थांबविण्यासाठी मदत होईल तसेच देशातील दरडोही उत्पन्न लक्षात घेता पाहूल उचलणे गरजेचे झाले आहे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना एका निवेदनातून केली आहे.
वणी ,मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. मोहदा, निळापूर, भालर वसाहत, निवली, नांदेपेरा, राजूर, उकणी, सुंदरनगर, नेरड, मूर्धोनी, केसुर्ली, लालगुडा, नायगाव, तसेच मारेगाव टाळक्यात अनेक गावात कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहे. बाधीत रुग्णांमुळेच त्यांच्या संपर्कातील व्यक्ती बाधीत होत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. कोवीड रुग्णात लक्षणॆ दिसताच जागेवरच चाचणी करून औषध उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होतो. प्रथम अवस्थेत उपचार करणे गरजेचे आहे.
गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, मंदिर चा विलगीकरण केंद्रासाठी उपयोग करावा. तर रुग्णाची देखभाल गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल व गावातील होतकरू तरुण, सरपंच, सदस्य युवा मंडळ, यांच्या मदतीने करता येईल. त्या सोबतच रुग्णाच्या आरोग्य विषयक देखभालीसाठी गावातील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, नर्स(NM) तसेच परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टर यांची नेमणूक करुन आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा गावात भेट देऊन रुग्णाची परिस्थिती कशी आहे. याबाबत मार्गदर्शन करुन औषधोपचार केल्यास रुग्णवाढीला निश्चितच आळा बसणार आहे. तर विलगीकरण केंद्रातील रुग्णांना घरचे जेवण, झोपण्याची व्यवस्था स्वतः करता येईल, व त्यांची खासगी रुग्णालयातील आर्थिक पिळवणूक थांबेल. तरी गाव तिथे विलगीकरण केंद्र निर्माण करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडून दिलीप भोयर, मंगल तेलंग, मिलिंद पाटील, ऍड विप्लोव तेलतुंबडे, रवी कांबळे, जिया अहमद, सतीश गेडाम यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...