Home / चंद्रपूर - जिल्हा / प्रशिक्षीत मनुष्यबळ...

चंद्रपूर - जिल्हा

प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्मितीसाठी कोविड क्रॅश कोर्स प्रोग्राम

प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्मितीसाठी कोविड क्रॅश कोर्स प्रोग्राम

 ईच्छुक पात्र उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 21 ऑक्टोबर: कोविडच्या पार्श्वभुमीवर प्रशिक्षीत मनुष्यबळासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत कोविड क्रॅश कोर्स प्रोग्राम या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण युवक-युवतींना देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त भय्याजी येरमे यांनी केले आहे.

या अभ्यासक्रमात कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत कोविड क्रॅश कोर्स प्रोग्राम राबविण्यात येत आहे. हेल्थ केअर सेक्टर स्किल कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले असून या कोर्सकरिता उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ईच्छुक पात्र उमेदवारांनी 26 ऑक्टोबर 2021 पर्यंत https://forms.gle/9RxTAeEHzJfDAnEh7 या गुगलफॉर्म द्वारे नोंदणी करावी.

प्रशिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

इर्मजन्सी मेडिकल टेक्निशियन व फेबोटॉमिस्ट या पदाकरिता शैक्षणिक पात्रता विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जनरल ड्युटी असिस्टंट, जनरल ड्युटी असिस्टंट ऍडव्हान्स तसेच होम हेल्थ ऐड पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर मेडिकल इक्विपमेंट टेक्नॉलॉजी असिस्टंट पदासाठी दहावी, आयटीआय तसेच इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटरशी संबंधित 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षण, कोर्सच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, हॉल क्रमांक 5/6, चंद्रपूर येथे प्रत्यक्षपणे अथवा 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...