खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी नगर पालिका दुर्लक्ष केल्याने अखेर नगरसेवक धिरज पाते यांनी स्वखर्चानेच ही कामे करणे सुरु केले आहे
भारतीय वार्ता (वणी): आज, दि.३/९/२१.रोजी. शहरातील समस्या सोडविण्याकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नगर पालिकेत एकहाती सत्ता असतांना देखील शहरातील बहुतांश वार्डांमधील समस्या आजही कायम आहेत. नगर पालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नगरसेवकांना समस्यांबाबत अवगत केल्यानंतरही समाधान न झाल्याने नागरिक नगर पालिकेकडे तक्रार करतात. पण नगर पालिकेकडूनही तक्रारीची दखल घेतल्या जात नसल्याने नागरिकांचा चांगलाच मनःस्ताप होत आहे.
वार्डातील समस्या सोडवता न आल्याने नगरसेवकांना नेहमी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पण वार्डातील समस्या सोडविण्याकरिता नगर पालिकेकडून हवी ती सहाय्यता मिळत नसल्याने नगरसेवकही हतबल झाले आहेत. रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे बुजविण्याकरिता व रस्त्यापर्यंत वाढलेली काटेरी झाडे छाटण्याकरिता नगर पालिकेकडे वारंवार साधन सामुग्रीची मागणी करूनही नगर पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर नगरसेवक धिरज पाते यांनी स्वखर्चानेच ही कामे करणे सुरु केले आहे. वार्डातील समस्या सोडविण्याकरिता येथे नागरसेवकाचीच दखल घेतली जात नाही, मग नागरिकांच्या तक्रारींना किती महत्व दिले जात असेल याचा प्रत्यय येतो.
शहरातील बहुतांश वार्ड आजही समस्याग्रस्त आहेत. आजही नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वार्डातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अंतर्गत सिमेंट रस्त्यांनाही तडे गेले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवरही खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भूमिगत गटार योजना रखडली आहे. काही वार्डातील नाल्या व गटारं अद्यापही भूमिगत झालीच नाही. बहुतांश वार्डातील काही भागांमध्ये तर अजूनही पक्के रस्ते नाहीत. काही ठिकाणच्या नाल्या फुटल्या आहेत. शहरातील काही भागात आजही अस्वच्छता पसरली आहे. रस्ते व नाल्यांविषयी नगरसेवकांकडे विचारणा केल्यास नगरसेवक नगर पालिकाच वेळ काढू धोरण घेत असल्याचे सांगतात.
.प्रभाग क्रमांक ७ मधिल रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याकरिता व रस्त्यापर्यंत वाढलेली काटेरी झाडे छाटण्याकरिता नगरसेवक धिरज पाते यांनी वारंवार नगर पालिकेला कळवूनही नगर पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. धिरज पाते यांनी २ मार्च, २६ जून व २ ऑगष्टला लिखित अर्ज देऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता व झाडे छाटण्याकरिता आवश्यक ती साधन सामुग्री उपलब्ध करून देण्याची नगर पालिकेला विनंती केली.
रस्त्यांवरील खाड्यांमुळे व रस्त्यावर आलेल्या झाडाझुडपांमुळे रहदारीला अडथळे निर्माण होऊन अपघाताची शक्यता बळावल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून धिरज पाते यांनी नगर पालिकेकडे या समस्या सोडविण्याची मागणी केली. पण नगर पालिकेने याकडे नेहमी दुर्लक्ष केल्याने अखेर नगरसेवक धिरज पाते यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजविनयचा निर्धार केला असून रस्त्यापर्यंत वाढलेल्या काटेरी झाडांची छाटणी करणे सुरु केले आहे. याआधी धीरज पाते यांनी गणेशपूर मार्गावरील नदीच्या पुलाजवळील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याकरिता पुढाकार घेतला होता.
बहुतांश वार्डात रस्त्यांच्या व नाल्यांच्या समस्या आहेत. त्या सोडविण्याकरिता नगर पालिकेने स्वखर्च करणाऱ्यांची वाट न बघता स्वतः पुढाकार घेऊन त्या सोडविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...