Home / महाराष्ट्र / कोरोना लसीकरणाला वणीत...

महाराष्ट्र

कोरोना लसीकरणाला वणीत प्रारंभ

कोरोना लसीकरणाला वणीत प्रारंभ

वणी:  संपूर्ण देशात पसरलेल्या महामारीला आळा घालण्यासाठी वैज्ञानिकांनी शोधलेल्या कोविड लसीकरणाची सुरुवात येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. येथील आरोग्य कर्मचारी नितीन खडतकर यांना सर्वप्रथम लस टोचून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. 
  या प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, वणी नगर पालिकेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, वणी पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर, जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई पावडे, बंडूभाऊ चांदेकर, न.प. उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, न.प. आरोग्य सभापती मंजुषा झाडे, नारायण गोडे, रवी साल्पेकर, ग्रामिण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भालचंद्र सुलभेवार येथील डॉक्टर वृंद व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 
येथील ग्रामीण रुग्णालयात 120 लसी उपलब्ध झाल्या असून आरोग्य विभागातील ज्या 100  कर्मचाऱ्यांची नावे आली आहेत त्यांनाच आज कोविडची लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग त्यानंतर पोलीस विभाग त्यानंतर महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. 
संपूर्ण देशात या लसीकरणाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोविड सारख्या विषाणूचा नायनाट करण्याची मोहीम सुद्धा या मार्गाने सुरू झाली आहे. आत्मनिर्भर भारत बनण्याच्या दिशेने भारताने टाकलेले हे एक महत्वपुर्ण पाऊल आहे. सम्पूर्ण जग मोठ्या आशळभूत नजरेने आपल्या देशाकडे पाहत असल्याचे प्रतिपादन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी येथील ग्रामीण रूग्णालयाच्या लसीकरण मोहिमेची सुरुवात फीत कापून करतांना केली. या प्रसंगी शहरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न 31 December, 2024

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न

वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...