Home / महाराष्ट्र / कोरोना रुग्णांची लाखोंची...

महाराष्ट्र

कोरोना रुग्णांची लाखोंची फसवणूक... आता खपवून घेणार नाही   :संतोष शिंदे 

कोरोना रुग्णांची लाखोंची फसवणूक... आता खपवून घेणार नाही   :संतोष शिंदे 

रुग्णाची खाजगी हॉस्पिटल'ची बिलं तपासावी... लाखोंचा भ्रष्टाचार...!!

भारतीय वार्ता (संतोष शिंदे): कोरोनामुळे प्रत्येक माणूस अडचणीत आला. जवळची खुप माणसं दगावली. वर्षभरात प्रत्येक माणसाची आर्थिक घडी विस्कटली. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणूस हा लॉकडाऊन आणि कोरोना आजारामुळे मेटाकुटीस आला, उध्वस्त झाला. संसार रस्त्यावर आले. सामान्य माणसाला जगणे मुश्कील झालं. मात्र दुसऱ्या बाजूला खाजगी हॉस्पिटल हे कोरोना बाधित रुग्णांना वाढीव बिल आणि लुटण्याचे एक 'कुरण' (सावज) निर्माण झालं. कोरोना बाधित प्रत्येक व्यक्तीला खाजगी रुग्णालयात दीड-दोन लाखाची बिलं हातात देण्यात आली, आणि कदाचित एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला असेल तर पैसे भरल्याशिवाय त्या व्यक्तीची डेड-बॉडी सुद्धा हातात दिली गेली नाही. कुठलाही औषधो उपचार नव्हता त्या काळात पॅरासिटामोल व इतर औषध गोळ्यांवर ज्यांची किंमत पाच -पन्नास -शंभर रुपये होती त्याच्यावर दीड-दोन लाख रुपये करण्यात आली. खाजगी हॉस्पिटल सर्वसामान्य लोकांना लुटण्याचा भ्रष्टाचाराचे सर्वात मोठं केंद्र बनलेलं आहे. यामध्ये मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांची फार मोठी सेटिंग आहे. आमदार मंत्र्यांच्या सत्ताधारी नेत्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा लोकांना सवलती दिल्या नाहीत उलट प्रचंड पैशांची लुबाडणूक करण्यात आली. खाजगी हॉस्पिटलमध्ये अक्षरशः आरोग्य यंत्रणेचा गैरवापर करून गोरख धंदा केला.हे सरकारने तपासावे असे लुटीच्या धोरण लक्षात घेता जबाबदारी स्वीकारावी असे संतोष शिंदे यांनी विचार व्यक्त केले.

महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजना असतानासुद्धा कोरोना रुग्णांकडून पूर्ण पैसे घेण्यात आले. म्हणजे सामान्य लोकांना खाजगी हॉस्पिटल की कुठलीही सुट सवलत दिलेली नाही. 'संभाजी ब्रिगेड' कडे भरपूर लोकांच्या तक्रारी आल्या. त्यावर आम्ही आवाज उठवला. मात्र खाजगी हाॕस्पिटल, मेडिकल व इतर आरोग्य यंत्रणेने सर्वसामान्य माणसाच्या खिशावर करोडो रुपयाचा दरोडा टाकलेला आहे. त्या सर्व बिलांची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे.अशी मागणी आहे.

पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, ठाणे सोलापूर, अमरावती व इतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील बहुतांश सर्व मोठे हॉस्पिटल हे धर्मदाय आयुक्त च्या अंतर्गत नोंदणीकृत आहेत. पुण्यासारख्या शहरात दीनानाथ मंगेशकर, रुबी हॉल, पूना हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल व इतर बहुतांश हॉस्पिटल हे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य रुग्णासाठी काही बेड (खाटा) राखीव (आरक्षित) ठेवण्याचे शासकीय आदेश आहेत. मात्र मोठे हॉस्पिटल, सर्व खाजगी हॉस्पिटल सरसकट सगळे राखीव बेड हे इतर लोकांना देऊन त्यावर करोडो रुपये कमावले आहेत. सरसकट सर्व रुग्णांना यांनी बुकींग करून वाढवून दिले. त्यामुळे गेल्या वर्षभरातील पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख हॉस्पिटलच्या कोरोना रुग्णांच्या बिलाची महाराष्ट्र सरकारने उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे अशी मागणी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने करत आहोत. राज्य सरकारने सर्व बिलांची तात्काळ चौकशी करून सर्व हॉस्पिटलवर, व तेथील गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून कठोर शासन झाले पाहिजेत... अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.

कोरोना काळ हा संकटाचा काळ होता व आहे. महाराष्ट्रासह देशावर आणि जगावर महामारीच्या रूपाने मोठे संकट आलेले आहे. महाराष्ट्रात फार मोठी महामारी आलेली आहे. बरीच माणसं यामध्ये मृत्युमुखी पावले आहेत. अशा काळात लोकांची लूट करणं किंवा त्यांना संकटात टाकणं ही निव्वळ देशाची केलेली गद्दारी व देशद्रोह आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीं गांभीर्याने घेऊन महाराष्ट्र सरकारने चौकशी करावी.

कोरोना काळात ज्यांच्यावर वाढीव बिले देऊन आर्थिक मानसिक त्रास दिलेला आहे अशा नागरिकांनी आमच्याशी संपर्क करून लेखी तक्रार द्यावी. ज्यांना ज्यांना खाजगी हॉस्पिटल ने लाखो रुपयांना लुटले आहे अशांनी बिला सह संपर्क मो.नंबर.942373 4817, 9850842703 वर सपर्ग करावा. तसेच या सर्व काळात काही अनुचित प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास आपण राज्य सरकारकडे पुराव्यासह याबाबत दाद मागू... आम्ही तुमच्यासाठी संघर्ष करू...!रुग्णाच्या आप्तसकियानी सात द्यावी आम्ही त्याला दाद देऊन सरकारला हक्का साठी प्रवृत्त करू असे आव्हान केले. लॉकडाऊन करण्यापेक्षा सरकारला विनंती... 'कोरोना' बाधित रुग्णांना खाजगी हॉस्पिटल लाखो रूपये घेऊन लुटत आहेत. सगळ्या बिलांची चौकशी करा... देशद्रोही गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे. कोरोना रुग्णांची अथवा नातेवाईकांची आर्थिक फसवणूक झाली असेल त्यांनी संपर्क करा

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...