मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
मुंबई दि.16 (प्रतिनिधी) : कोरोनाविरोधातील लढ्यासाठी ठाकरे सरकारकडून राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाउन लावण्यात आला आहे. एकीकडे कठोर निर्बंध लावण्यात आले असताना दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील अनेक डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांसमोर ‘माझा डॉक्टर’ अशी संकल्पना मांडत कोरोनाविरोधातील लढाईत मैदानात उतरण्याचे आवाहन केले. डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. राहुल पंडित यावेळी उपस्थित होते.
कोविडची लढाई मोठी आहे. भयानक आणि जीवघेणी आहे. या लढाईत लढण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना सोबत येण्यासाठी मी साद घालत असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.
गेल्या वर्षी अंधार असताना तज्ज्ञ डॉक्टरांची मोठी मदत झाली. आपल्याकडे उपचार पद्धती काय असली पाहिजे, कशावर, कोणते औषध आणि किती प्रमाणात द्यावे यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. माझा डॉक्टर संकल्पना मांडताना उद्धव ठाकरेंनी सांगितले, जगातील प्रत्येक घरात एक तज्ज्ञ डॉक्टर असतो. प्रत्येकाकडे आपला एक डॉक्टर असतो, त्याचा सल्ला घेऊनच लोक निर्णय घेत असतात. आपल्याही कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असतो. त्याच्याकडे कुटुंबातील प्रत्येकाची माहिती असते, असे त्यांनी सांगितलं.
70 ते 75 टक्के रुग्ण लक्षणे नसणारे असतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसते. पण काही दिवसांनी मृत्युदर वाढला, असे लक्षात येते. तेथील डॉक्टर रुग्ण उशिरा आल्याचे सांगतात. घरच्या घरी अंगावर गोष्टी काढल्या जातात. याला आपण लक्ष्मणरेषा म्हणून कशी हे काम तुम्ही करायचे आहे. घरच्या घरी उपचारांचे होम मॅनेजमेंट करण्यासाठी आता शिवधनुष्य उचलले पाहिजे. घरच्या घरी उपचार घेऊन रुग्ण बरे होऊ शकतात. पण त्यांच्या उपचारावर लक्ष देणे, योग्य औषध देणे यासाठी तुम्हाला काम करायचे आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
कोविड झाल्यानंतर रुग्णाचे शरीर साखरेचे पोत होऊ नये आणि ज्यांना डायबेटिस आहे ते नियंत्रित ठेवणे, इतर सहव्याधींवरही नियंत्रण ठेवले गेले पाहिजे. तरच आपल्याला संकट वेळीच रोखता येईल. घरच्या घरी उपचाराची जबाबदारी आपण घेतली पाहिजे तसेच नजीकच्या जम्बो सेंटर्समध्ये आपण सेवा देऊ शकलात तर रुग्णांनाही दिलासा मिळेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
चक्रीवादळ आपल्या उंबरठ्यावर आहे. धोका कदाचित टळणार असला तरी किनारपट्टीवर थोड्या प्रमाणात धुमाकूळ घालणार आहे. 1 जूनपासून पावसाळा सुरू होईल. त्यानंतर परीक्षा कठीण होणार आहे. साथीचे रोग आणि कोविड याचे आव्हान असणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.
आपल्याला जे काही समर्थन लागेल ते सरकार म्हणून देण्यास तयार आहोत, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन दिले. संपूर्ण ताकद दिल्याशिवाय हे सरकार थांबणार नाही, असेही ते म्हणाले. सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद आहेत. तो देव डॉक्टराच्या रूपात मला दिसतोय. विज्ञान असतो तिथे यश मिळते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केले आहे.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
"लस घेऊन विषवंत होऊ नका !"✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक) मो.९७६२६३६६६२ कोरोना या बनावट...
चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...
चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...