खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय-वार्ता (वणी ): विजबिलाचा भरणा न केल्याने विजबिलाची थकबाकी रक्कम वाढतच गेली. वेळोवेळी सूचना देऊनही विजबिलाचा भरणा करण्यात न आल्याने विज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याच्या आदेशावरून विद्यूत कर्मचाऱ्यांनी एका व्यावसायिकाच्या घरचा विज पुरवठा खंडित केला. घरगुती वीज कापल्याने सदर व्यावसायिक कमालीचा चिडला. त्याचा राग अनावर झाला. त्याने शहरातील कॉटन मार्केट परिसरातील विज वितरण कंपनीचे कार्यालय गाठत माझ्या घरचा विज पुरवठा का खंडित केला म्हणून सहाय्यक अभियंत्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने सहाय्यक अभियंत्यांचा हात पिळगळून त्यांना तुम्हाला बघून घेईन अशी धमकी दिली. या आधीही या व्यावसायिकाने सहाय्यक अभियंत्याच्या सहकाऱ्यांजवळ त्यांना चंद्रपूर येथे जाऊन मारण्याची धमकी दिली होती. सदर व्यावसायिकाने बघून घेण्याच्या दिलेल्या धमक्या व शिवीगाळ करून अंगावर हात उचलल्याबद्दल सहाय्यक अभियंत्याने या व्यवसायिकाविरुद्ध वणी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. ही घटना आज २० सप्टेंबरला सायंकाळी ५.२२ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील बन्सल ले-आऊट येथे राहणाऱ्या राज नंदलाल जयस्वाल यांच्याकडे १५ हजार ८७८ रुपयांचे विज बिल थकीत आहे. विज कर्मचाऱ्यांनी त्यांना त्यांच्या दुकानात जाऊन विजबिल भरण्याच्या वेळोवेळी सूचना दिल्या. परंतु राज जयस्वाल याने विज कर्मचाऱ्यांनाच दमदाटी करून आता तुम्ही येऊ नका तुमच्या साहेबांना माझ्याकडे पाठवा असे ठणकावून सांगितले. विज कर्मचाऱ्यांनी हा निरोप सहाय्यक अभियंता राजेश बालाजी जिझिलवार (५२) यांना दिला. राजेश जीझिलवार यांच्या कडे शहर क्रं १ मधिल विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यापासून तर विद्युत बिलाची थकबाकी वसूल करण्याचे कार्य देण्यात आले आहे. सायंकाळी ४.३० वाजता सहाय्यक अभियंता राजेश जीझिलवार आपल्या काही कर्मचाऱ्यांसह बन्सल ले-आऊट येथिल राज जयस्वाल परिवारासह रहात असलेल्या घरी गेले. त्यावेळी तेथे एक महिला व राज जयस्वाल याचा मुलगा होता. त्या मुलाला १५ हजार ८७८ थकीत विजबिलाचा भरणा केला काय, असे विचारले असता त्या मुलाने ते वडिलांनाच माहिती असेल, असे उत्तर दिले. त्यामुळे सहाय्यक अभियंता राजेश जीझिलवार याने राज जयस्वाल याच्या घराजवळील पोलवरून त्याच्या घरचा विज पुरवठा खंडित केला. राज जयस्वाल याला आपल्या घरची विज कापल्याचे कळताच तो कमालीचा चिडला. त्याने आपल्या मित्रासह विज वितरण कंपनीचे कार्यालय गाठत घरची विज का कापली असा प्रश्न करून सहाय्यक अभियंत्याला शिवीगाळ केली. तो एवढ्यावरच थांबला नाही,तर त्याने सहाय्यक अभियंत्याला बघून घेईन अशी धमकी देत त्यांना हात मुरगाळला. या आधीही त्याने सहाय्यक अभियंत्याच्या सहकाऱ्यांजवळ त्यांना चंद्रपूर येथे जाऊन मारण्याची धमकी दिली होती. राज जयस्वाल यांनी मारण्याची धमकी देत अंगावर हात उचलल्याची तक्रार राजेश जिझिलवार यांनी पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज जयस्वाल याच्यावर भादंवि च्या कलम ३५३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...