Home / चंद्रपूर - जिल्हा / जिल्ह्याधिका-यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा

जिल्ह्याधिका-यांच्या संकल्पनेतून 10 दिवसांत 2604 वनराई बंधाऱ्यांची  निर्मिती  

जिल्ह्याधिका-यांच्या संकल्पनेतून 10 दिवसांत 2604 वनराई बंधाऱ्यांची  निर्मिती  

शेतकऱ्यांसाठी होणार संरक्षित सिंचनाची सोय

चंद्रपूर, दि. 2 नोव्हेंबर : शेतकऱ्यांना खरीपासोबत रब्बी आणि उन्हाळी पिके घेण्याची सोय झाली तर त्यांचे उत्पन्न वाढेल. दोन पैसे हाती येईल. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचविण्यास मदत होईल, या जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने यांच्या अभिनव संकल्पनेतून जिल्ह्यात " वनराई बंधारा" ची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत केवळ 10 दिवसात जिल्ह्यात लोकसहभागातून 2604 वनराई बंधारे बांधण्यात आले आहे. 

जिल्ह्यात 5 हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असून आतापर्यंत प्रत्येक दिवशी सरासरी 260 याप्रमाणे दहा दिवसांत 2604 बंधारे बांधण्यात आले आहे. जिल्ह्यात लोकसहभागातून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधि, नागरिक, विद्यार्थी आदिंचा सहभाग आहे. बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता पाहून प्रति बंधारा कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 25 एकरापर्यंत सिंचनाची सोय होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात वनराई बंधा-याच्या माध्यमातून 40 ते 45 हजार एकरवर सिंचन निर्मिती होण्यास मदत होईल. जिल्ह्यात विहिरींची संख्या कमी आहे आणि बोरवेलसाठी सुद्धा मर्यादा आहेत. त्यामुळे ठिबक सिंचनाचा लाभ पाहिजे त्या प्रमाणात देता येत नाही. त्यामुळे वनराई बंधाऱ्याचा पाण्याचा स्त्रोत असेल तर शेतकरी गटांना ठिबक सिंचनाचा लाभ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतला आहे.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चंद्रपूर तालुक्यात 210 बंधारे, बल्लारपूर 240, मुल 270, सावली 130, वरोरा 152, चिमूर 120, भद्रावती 145, नागभीड 180, ब्रह्मपुरी 215, सिंदेवाही 157, राजुरा 245, गोंडपिपरी 210, पोंभुर्णा 120, कोरपना 140 तर जिवती 70 असे एकूण 2604 बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.

सहज बांधता येईल असा वनराई बंधारा :

12 मीटर पर्यंतचा वनराई बंधारा बांधण्यासाठी 700 ते 800 रिकामी पोती, घमेली, फावडा व प्रवाहाच्या आजूबाजूला असलेली माती एवढ्या गोष्टीची आवश्यकता असते. बांधकाम करताना भरलेल्या मातीच्या पिशव्या दोरीने शिवुन तयार कराव्यात. वनराई बंधारा बांधत असतांना, जागेची निवड करतांना ओढ्याची रुंदी कमी असावी. पाणी साठा भरपूर प्रमाणात होईल याची दक्षता घ्यावी. बंधाऱ्याचे दोन्ही काठ हे चांगल्या पद्धतीचे असले पाहिजे.

बंधारा बांधायला सुरूवात करण्यापूर्वी प्रवाहवरील दगड व गाळ काढून साफ करून घ्यावा. जेणेकरून बंधाऱ्याच्या खाली राहणाऱ्या मोकळ्या जागेतून पाणी वाहून जाणार नाही. 0.60 मीटर रुंदीच्या पोत्याच्या दोन रांगा प्रथम तयार कराव्यात. त्यांच्यामध्ये 0.30 मीटरचा गॅप ठेवावा. काही ऊंचीपर्यंत पोत्याचे 3 थर तयार करावेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली. 

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...