Home / चंद्रपूर - जिल्हा / संविधानाने भारतीयांना...

चंद्रपूर - जिल्हा

संविधानाने भारतीयांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला -विकास कुंभारे

संविधानाने भारतीयांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला -विकास कुंभारे

कोलाम गुड्यावर संविधान दिन आणि विर शामादादा कोलाम जयंती साजरी

जिवती: महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल केला आहे आणि प्रगतीची समान संधी दिली आहे. मात्र व्यवस्थेत बसलेल्या काही संधीसाधू लोकांमुळे समाजातील अनेक घटक त्या मौलिक अधिकारांपासून वंचित आहे. अशा तळागाळातल्या घटकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचविणे व समाज जागृती करणे यासाठी कोलाम विकास फाऊंडेशन सदैव कार्यरत राहिल व दुर्गम अशा माणिकगड पहाडावरील आदिम कोलामांच्या जिवनातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करेल, असे भावोद्गार कोलाम विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विकास कुंभारे यांनी काढले.

जिवती तालुक्यातील सितागुडा या कोलाम वस्तीत संस्थे व्दारा चालविल्या जाणा-या विर शामादादा कोलाम वाचनालय-अभ्यासकेंद्र येथे भारतीय संविधान दिन व विर शामादादा कोलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी गाव पाटील भिमराव मडावी, ग्रामपंचायत सदस्य बापूराव आत्राम, केंद्र संचालिका कर्णिबाई आत्राम, मारू आत्राम, सुनिता कुंभारे आदि मान्यवर उपस्थित होते.

गुलामगिरीच्या काळात विर शामादादा कोलाम यांनी जंगलातील आदिवासींसाठी मोठा संघर्ष केला व कोलामांच्या जिवनातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून कोलाम समुदायांनी संपूर्ण समुदायाच्या विकासासाठी प्रयत्न करत राहणे व नव्या पिढी पुढे नवे आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत गाव पाटील भिमराव मडावी यांनी मांडले.

या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर व विर शामादादा कोलाम यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे पाठविण्यात आलेल्या गणवेशाचे विद्यार्थ्यांमध्ये वितरण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे यावेळी अभ्यासकेंद्रातील स्क्रीन प्रोजेक्टर च्या माध्यमातून 'जयभीम' हा हिंदी चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...