खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता ( मोहदा प्रतिनिधी):- वणी तालूक्यातील मोहदा येथे अनेक गौणखनिज खदानी असून भांडवलीदाईत्वाचा सावळा गोंधळ जागृत शेतकरी रवींद्र रामदास राजूरकर यांच्या अपीली प्रकरणाने उघळकीस आले असून ब्रेक दिला गेला असल्याचे उपविभागीय अधिकारी याच्या पत्रावरून समोर आले आहे.
त्रिमूर्ती मेटल्स च्या संचालक मनोरमा इंदरसिंह यांनी खाजगी गट क्र 281मधील क्षेत्र 2-25हे. आरमधील गौण खनिज उत्खनन करण्यासाठीअर्ज सादर करण्यात आला होता,त्या अर्जाच्या अनुषंगाने दि 25-2-2021 च्या पत्राअन्वये आक्षेप नोंदीच्या सूचना दिल्या असता प्रतिवादी राजूरकर याच्या आक्षेपा वरून दि.26-3-2021 रोजी सुनावणी ठेऊन प्रकरण न्यायप्रविष्ठ ठेवले असता स्थानिक महसूल अधिकारी यानी गौणखनिज व वाहतूक परवाना देऊन प्रतीवादीच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली गेली असता वादीने दि.27-10-2021ते .27-11-2021 लापरवाना प्राप्तला स्थगनादेश दि.22 नोव्हेंबर ला ऍड एस पी वऱ्हाटेयानी महसूल अधिनियम 1966चे कलम 247नुसार अपीली अर्ज सादर केला गेला आहे. या वर गौणखनिजला ब्रेक झाला असला तरी प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना जणू गौन खनिज उत्खनन करण्याचा तात्पूरता परवाना देवून महसूल विभागाने खैरातच वाटली आहे. याबाबत तक्रारदारांनी अपिल केली असता उपविभागीय दंडाधिका-यांनी सदर आदेशाला स्थगिती दिल्याची माहिती आहे.
तालूक्यातील मोहदा येथे गिट्टीच्या खाणी असून आधळा दळतो कुत्र पीठ खातो अशी गत खदान व महसूल विभागाची असताना गावातील आठ ते दहा लोकांनी यावर आक्षेप घेत अर्ज सादर केला होता. आक्षेप असतांना देखिल महसूल विभागाने संबधीताला गिट्टी,मुरूम उत्खनन करून तो वाहतूक करण्यासाठी जवळपास एक महिण्याचा परवाना बहाल केला होता. संबधीतांने महसूल विभागाचा आदेशावरून उत्खनन सुरू केले होते. या प्रकरणात तक्रारदारांनी उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे सदर प्रकरणाला स्थगिती मिळावी म्हणून विनंती अर्ज दाखल केला होता.
त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी गौन खनिज परवान्याला स्थगिती दिली आहे. तालूक्यात गौन खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी सुरू आहे.या चोरीला जणू महसूल विभागाचे पाठबळच असल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे. महसूल विभागात संबधीत प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना एक महिन्याचा परवाना देवून अधिका-यांनी खैरात वाटल्याने येथे न्याय मिळेल काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.देण्यात आलेल्या परवाना जर ग्राहय नसेल तर त्या चोरीचे वाटेकरी कोण? हा प्रश्न वादी व परिसरातील नागरिकांना पळला आहे, आक्षेप असून हम करे सौ कायदा असेल तर शासन गौणखनिजाचे चांग भले आहे तर कोना साठी हा प्रश्न या अपीली तक्रारीवरून उपस्थित केला जात आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...