आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव : अतिवृष्टीच्या मदती पासून वंचीत असलेल्या तालुक्यातील कुंभा-वनोजादेवी-मारेगाव या तीन मंडळातील सर्व गावांना अतिवृष्टी नुकसान ग्रस्तच्या यादीत समाविष्ट करा.व या मंडळातील नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवाना अतिवृष्टी नुकसान भरपाई ची आर्थिक मदत करा.या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे जेष्ट नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगावचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे यांच्या नेतृत्वात, इमाव बहुजन कल्याणविभाग,खार जमिनी विकास तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांना थेट चंद्रपूर येथे जावून निवेदन देण्यात आले.
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जळका, मार्डी, मारेगाव, वनोजादेवी,कुंभा या पाचही मंडळातील हजारो शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले.मात्र तालुक्यातील या पाच मंडळा पैकी केवळ जळका व मार्डी या दोनच मंडळातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासना कडुन नुकसान भरपाईची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.मात्र यात कुंभा-मारेगाव-वनोजादेवी या मंडळातील सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतातील कापुस,तूर,सोयाबीन या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. परंतू या तीन मंडळातील हजारो शेतकऱ्यांचे नाव यादीत न आल्याने, शासनाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या मदती पासुन वंचीत राहले आहे.
त्यामुळे या तीन मंडळातील नुकसान ग्रस्त शेतकरी बांधव आर्थिक विवेचनात आला आहे.त्यामुळे शासनाच्या नुकसान भरपाई च्या मदती पासून वंचीत असलेल्या या तीन मंडळातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा मदतीची गरज असल्याने या विषयाची दखल घेत कॉंग्रेसच्या वतीने, मदती पासुन वंचीत असलेल्या कुंभा-मारेगाव- वनोजादेवी या तिन्ही मंडळातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश करून त्यांना नुकसान भरपाई ची मदत जाहीर करण्यात यावी. या आशयाचे निवेदन इमाव बहुजन कल्याणविभाग,खार जमिनी विकास तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूर येथे भेट देवून यावर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी नामदार वडेट्टीवर यांनी मारेगाव तालुक्या सह वणी झरी तालुक्यातील सुद्धा वगळण्यात आलेल्या मंडळाचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या कडुन मागवून हा प्रश्न लवकरच मार्गी लावु असेही आश्वासन दिले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव चे सभापती तथा काँग्रेस चे जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे, जिल्हा सरचिटणीस रमण डोये,तालुका अध्यक्ष मारोती गौरकार आदी उपस्थित होते
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...