*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : जनगणनेसाठी ओबीसांचा एल्गार; आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे “एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना आम्हाला आमच्या हक्काचे आधी तर द्या मग ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत. बहुजन कल्याण विभाग मंत्री म्हणून ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेली आहे. आवश्यकता पडल्यास स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव मी विधानसभेत मांडेल. जेथे संधी मिळेल तेथे ओबीसी समाजाचा आवाज उचलून धरणार. पक्ष, जात विसरून फक्त आणि फक्त ओबीसी म्हणून उभा आहे.” असं विधान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जालन्यात केलं आहे.आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे.
ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी आज(रविवार) जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक प्रमुख ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी मोर्चेकऱ्यांकडून आता मुख्यमंत्री ओबीसीचाच असे बॅनर्सही झळकवण्यात आल्याचे दिसून आले.
या मोर्चाला सुरुवातीस पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, नंतर मोर्चा काढण्यास पोलिसांनी सशर्त परवानगी दिल्याने, मोर्चा काढण्यात आला.
यावेळी वडेट्टीवार यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची देखील आठवण काढली. आपल्याला लढण्याची प्रेरणा गोपीनाथ मुंडे यांच्याकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी बोलून दाखवलं व त्यांच्या संघर्षाला सलाम देखील केला. मी पक्ष, धर्म, जात-पात सोडून केवळ ओबीसीसाठी लढत असल्याचेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.ओबीसी चेहरा पुन्हा पुन्हा उदयास यईल जो पर्यत आमची जातवार जनगना होणार नाही, तो पर्यत खंयर नाही.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...