Home / चंद्रपूर - जिल्हा / समुदाय संसाधन कर्मचाऱ्यांचे...

चंद्रपूर - जिल्हा

समुदाय संसाधन कर्मचाऱ्यांचे मानधन मिळणार

समुदाय संसाधन कर्मचाऱ्यांचे मानधन मिळणार

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश 

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा उमेद अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये समुदाय संसाधन व्यक्तींची महत्त्वपूर्ण भूमिका असून समुदायस्तरीय संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या सेवा यापुढेही समुदायास उपलब्ध होत असतात. ग्रामसंघ व प्रभागसंघांना शासनाकडून अभियानामार्फत निधी उपलब्ध होत नसल्यामुळे समुदाय संसाधन व्यक्तींचे मानधन सतरा महिन्यापासून प्रलंबित असलेले मानधन प्रलंबित होते. त्याकरिता वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या महिला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः भेटून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मानधन देण्याविषयी मागणी केली होती. त्याची दखल घेत उमेद कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येणार आहे. 

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समुदायस्तरीय संस्था जसे की ग्रामसंघ व प्रभागसंघ यांच्यामार्फत समूह संसाधन व्यक्तींची (सीआरपी) नेमणूक मानधन तत्वावर संस्थामार्फत करण्यात आलेली आहे. गरिबांना गरिबीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना पोषक वातावरणाची आवश्यकता असते हे सूत्र लक्षात घेऊन अभियान सुरु झाल्यापासून मागील आठ वर्षात तयार करण्यात आलेले स्वयंसहाय्यता गटांना प्रशिक्षण देऊन व आर्थिक सहाय्य करुन त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी अभियानांतर्गत सातत्याने काम करण्यात येत आहे. अभियानांतर्गत तयार झालेले स्वयंसहाय्यता गटातील महिला अभियानाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होत असून त्यांच्याकडे उपजीविकेचे स्त्रोत निर्माण करण्यात येत आहेत परंतु गाव स्तरावर कार्यरत समूह संसाधन कर्मचाऱ्याचे मानधन मागील सतरा महिन्यापासून मिळाले नसल्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः भेटून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मानधन देण्याविषयी मागणी केली होती. त्याची दखल घेत उमेद कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे उमेदीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. सर्वानी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या आभार मानले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...