Home / चंद्रपूर - जिल्हा / रोटरी क्लब व श्री स्वामीकृपा...

चंद्रपूर - जिल्हा

रोटरी क्लब व श्री स्वामीकृपा ट्रेडर्स वरोराचा  स्तुत्य उपक्रम

रोटरी क्लब व श्री स्वामीकृपा ट्रेडर्स वरोराचा  स्तुत्य उपक्रम

 श्री भाऊराव देऊळकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ५ ० खेळाडूंना स्पोर्ट किट वितरण

खेमचंद नेरकर  (वरोरा) :  देशी खेळ खो -खो ला चालना मिळावी व खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर नाव कमवावे या उदात्त हेतूने येथील प्रशिक्षकांचे खेळाडू घडविण्याचे काम मागील अनेक दिवसांपासून अविरत सुरू आहे.  क्रिडा संकुलात खो - खो चे विनिमुल्य प्रशिक्षण केंद्र चालविले जाते. या प्रशिक्षणाचा लाभ तालुक्यातील खेळाडू घेतात. ग्रामीण खेळाडूंमध्ये गुणवंत्ता असूनही  हलाखीच्या परिस्थितीमुळे इतरांच्या तुलनेत मागे राहतात.

अशातच खो - खो खेळाडूंना स्पोर्ट किट नसल्याने इतरांच्या तुलनेत ते कमी पडतात, अशी खंत खो - खो प्रशिक्षकांनी सामाजिक कार्यकर्ते बंडू देऊळकर यांच्या कडे व्यक्त केली असता त्यांनी  यावर होकार दर्शविला. खेळाडूंची संख्या व माहिती जाणून घेतली. तदनंतर बंडू देऊळकर यांनी त्यांचे वडील माजी केंद्रमुख्याध्यापक भाऊराव देऊळकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब वरोरा व श्री स्वामीकृपा ट्रेडर्स वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लबचे प्रांतपाल रोटे. रमेश मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली व सह प्रांतपाल मुरली लाहोटी, रोटरी क्लबचे वरोरा अध्यक्ष  हिरालाल बघेले, सचिव बंडू देऊळकर, रोटरी क्लब वरोरा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वरोरा क्रिडा संकुल परिसरात ५० खेळाडूंना नुकतेच स्पोर्ट किटचे वितरण केले.

सामाजिक कार्यकर्ता बंडू देऊळकर यांनी मागच्या वेळेस आपल्या वाढदिवसानिमित्त गरीब, दलित - आदिवासी मुलामुलींसाठी नागपूरची शैक्षणिक सहल आयोजित करून दिली होती, हे विशेष. अध्यक्षीय भाषणात रमेश मेहेर यांनी भारतातील सर्वात लोकप्रिय व पारंपरिक  खेळ खो - खोच्या प्रगतीच्या दृष्टीने प्रशिक्षकांनी टाकलेल्या आदर्श पाऊलाबदद्ल व त्याला उत्कृष्ट दिलेल्या सहकार्याबद्दल खेळाडूंचे कौतुक केले. रोटरी सचिव बंडू देऊळकर यांच्या स्तुत्य उपक्रमाचीही प्रशंसा केली. या प्रसंगी खो- खो प्रशिक्षक सुधीर कुंभारे,जांभुळे सर, सचिन सायंकार, रोटेरियन पदाधिकारी व सदस्य इ.उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...