वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर दि.30 सप्टेंबर: 1 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात रक्ताची गरज लक्षात घेता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केलेल्या आवाहनाला औद्योगिक समुहांनी प्रतिसाद देत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यास सुरवात केली आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या 35 शिबिरातून 1411 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आल्याची माहिती रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांनी दिली.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी रक्तदान चळवळीत सहभाग नोंदवून युद्धस्तरावर अनेक उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. याकरीता सर्व औद्योगिक समूहांच्या व्यवस्थापकांसोबत त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठका आयोजित केल्या. जिल्ह्यातील विविध उद्योगसमूहांना रक्तदान चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत औद्योगिक समूहांनी रक्तदान शिबिराचे आयोजन सुरू केले आहे. या रक्तदान शिबिराला जिल्हाधिकारी स्वतः उपस्थित राहून तेथील शिबीर आयोजक व रक्तदात्यांना प्रोत्साहन देत आहे.
तसेच जिल्ह्यामध्ये वर्षभर रक्तदान शिबिराचे आयोजन व्हावे, याकरीता सर्व शासकीय, निमशासकीय विभागाला तसेच राष्ट्रीयकृत बँकाना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रात माहे सप्टेंबर महिन्यात 9 उद्योगसमूहांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यात आतापर्यंत एकूण 525 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
सप्टेंबर महिन्यात एकूण 35 रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यात एकूण 1411 रक्तपिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले आहे. या रक्तसंकलनामध्ये जिल्ह्यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सेवाभावी संस्थेने तसेच स्वच्छिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला. याकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत व रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांचे सहकार्य लाभले आहे
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...