आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
तालुकास्तरावर प्रशिक्षण केंद्र वाढविण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश
आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 18 ते 45 वयोगटातील आठवी ते पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी व नागरिकांना आरोग्य क्षेत्रातील अल्प मुदतीचे अभ्यासक्रम शासनामार्फत मोफत शिकविण्यात येत आहेत. हे अभ्यासक्रम जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय असणाऱ्या सर्व तालुक्यात सुरू करण्यात यावे, जेणेकरून पुढील तीन महिण्यानंतर सर्व तालुक्यात प्रशिक्षीत आरोग्य कर्मचारी सहज उपलब्ध राहतील व त्यांचा फायदा प्रशिक्षणार्थ्याला रोजगार मिळण्यास व आरोग्य यंत्रणेला प्रशिक्षीत कर्मचारी वर्ग उपलब्ध होण्यास होईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केल्या.
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सुरू प्रशिक्षणबाबतचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात घेतला. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. शरद मानकर, आयुर्वेदीक कॉलेजचे डॉ. मनोज येरावार, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. मनोज सत्यपाल प्रामुख्याने उपस्थित होते.
सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 65 प्रशिक्षणार्थी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अख्त्यारीत उपजिल्हा रुग्णालयात 110 प्रशिक्षणार्थी तर आयुर्वेद विद्यालयाअंतर्गत 100 प्रशिक्षणार्थीचे प्रवेश झाले असल्याची माहिती दिली. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे व्हीजन असीस्टंट, होम हेल्थ एड, इमर्जन्सी मेडीकल टेक्नीशियन, फ्लेबोटोमीस्ट, ड्रेसर या अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी 15 याप्रमाणे एकूण 75 जागा तर उपजिल्हा रूग्णालय पांढरकवडा येथे फ्लेबोटोमीस्ट, गेरियाट्रीक केअर एड, डायेटीक एड, मेडिकल रेकॉर्ड ॲण्ड हेल्थ इनफॉर्मेशन या अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी 10 याप्रमाणे एकूण 40 जागांवर प्रवेश प्रक्रीया सुरू असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मोफत रजिस्ट्रेशनसाठी www.mhaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे व अधिक मार्गदर्शनासाठी उद्योग भवन, यवतमाळ येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात प्रत्यक्ष भेट देण्याचे किंवा 07232-244395 या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले असल्याचे सांगितले.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...