भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
Reg No. MH-36-0010493
तपासणी, औषधोपचाराची मोफत सुविधा
चंद्रपूर, दि. 17 : आयसीआयसीआय बँक फाउंडेशनच्या वतीने मेडिकेअर हेल्थ सर्व्हीसेस मार्फत ब्रम्हपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यासाठी तीन फिरत्या दवाखान्यांची सेवा उपलब्ध झाली आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी केले.
ब्रम्हपुरी येथे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज दवाखान्यांचा (मोबाइल क्लिनीक व्हॅन) लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार अभिजीत वंजारी, नगराध्यक्षा रीता उराडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सीईओ डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ. निवृत्ती राठोड आदी उपस्थित होते.
फिरते दवाखाने हे गावागावात जावून नागरिकांची तपासणी करणार आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, या माध्यमातून रक्तदाब, मधुमेह, डेंगू, मलेरिया आदी संसर्गजन्य आजारांची चाचणी करून मोफत औषधोपचार केला जाईल. जिल्ह्यातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार असल्यामुळे नागरिकांनी सुद्धा नेमुन दिलेल्या वेळेत उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
सदर उपक्रमासाठी समन्वयक म्हणून उपमुख्यमंत्री कार्यालयातील कौस्तुभ बुटाला हे जबाबदारी पार पाडत असून, आयसीआयसीआय बँकेच्या गव्हर्नमेंट ॲण्ड इन्स्टीट्यूट बिझनेसचे सौरभ सिंग, वेस्टर्न झोनचे आशिषकुमार रंजन, विवेक बल्की यांच्या प्रयत्नामुळे ही सेवा उपलब्ध होत आहे.
या व्हॅनमध्ये एक डॉक्टर, परिचारिका व हेल्पर राहणार आहे. या फिरत्या दवाखान्यांमध्ये सहा प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार असून कोरोनाची चाचणीही केली जाणार आहे. या दवाखान्यांमध्ये प्राथमिक आरोग्यासाठी २० प्रकारची औषधी उपलब्ध आहे. ग्रामस्थांच्या तपासणीनंतर तीन दिवसापर्यंतची औषधी मोफत दिली जाणार आहे.
चौकट......
मोबाइल ट्रेकिंग सिस्टीम व ॲपचीही सुविधा या फिरत्या दवाखान्यामध्ये विकसित करण्यात आली आहे. या सिस्टीममध्ये व्हॅनमधील स्वच्छतेसह दररोज होणाऱ्या तपासण्याचा तपशिल, व्हॅन कुठे जाते, किती किलोमीटर फिरते याचाही तपशिल राहणार आहे. शिवाय डॉक्टर-पेशन्ट ॲप हे देखील रुग्णांच्या उपयोगी पडणारे ॲप यात आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर व ॲप डाऊनलोड केल्यानंतर रुग्णांची सर्व माहिती भरल्यास सदर माहिती डॉक्टरांच्या मोबाइलवर जाईल. त्यावरून डॉक्टरांकडून औषधींचा तपशिल मोबाइलवरच पाठविला जाणार आहे.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....
वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...
*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...