Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / शिरपुर विद्युत विभागाच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

शिरपुर विद्युत विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या गावात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैरान..!

शिरपुर विद्युत विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या गावात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैरान..!

माजी जि. प.सदस्य विजय पिदूरकर यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन, समस्या निकाली न काढल्यास आंदोलनाचा इशारा.

(वणी-विभागीय-प्रतिनिधी ): तालुक्यातील शिरपुर विद्युत विभागाकडे परिसरातील 55 गावांचा समावेश असुन मागील 3 ते 4 महिन्यापासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरीकांना विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. परिनामी विध्युत विभागाने लक्ष देण्याची मागणी दि.२१ सप्टेंबर ला उपविभागिय अधिकारी डॉ.शरद जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे कि, ग्रामीण भागात 90% नागरीक शेती व्यवसाय करतात, वातावरणातील बदल थोडा पाउस हवा आली की लाईन गेली यामुळे दिवसभर शेतात राबुन आल्या नंतर अंधारात महिलांनी स्वयंपाक करायचा कसा ?तसेच मोबाईल चार्ज होत नाही. परिणामी ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांचे आनलाईन शैक्षणिक नुकसान होत आहे. याची भरपाई कोण देणार ? पोळा सनाला काही गावांना 2 दिवस आंधारात काढावे लागले. याच बरोबर गावातील नळ योजना जलशुध्दिकरण यंत्र घरगुती मोटार कमी जास्त विद्युत दाबामुळे नादुरुस्त होते. यापूर्वी कोरोना, आता डेंगु मलेरीया साथीमध्ये घरातील आजारी वृध्द नागरीक, गरोदर माता, लहान बालके, यांनी उष्णतेमुळे किती त्रास सहन करायचा, ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना स्वताचे भांडवल व कर्ज काढुन लावलेला व्यवसाय उदा. वेल्डींग, इलेक्ट्रीक दुरूस्ती, पिठ गिरणी, रेडिमेट कापड दुकान, मेडिकल, कृषीकेंद्र, कुक्कुटपालन, झेराक्स, सेतुकेंद्र, यामधुन उत्पन्न न झाल्यास बँकेचे हप्ते कोठुन देणार असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असुन विद्युत विभागाच्या वेळकाडु धोरणामुळे ग्रामीण लघु व्यवसायीक यांचे जिवन उदवस्त झाल्याशिवाय राहणार नाही. या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपुर, कोलगांव व उपकेंद्रा मध्ये चालणारे प्रसुती, कुंटुबकल्याण उपचारा दरम्यान खंडित विद्युत पुरवठामुळे अनेक समस्या निर्माण होतात. याचबरोबर गावागावातील गावठाण ट्रान्सफार्मर, सडलेली पेटी, फाटक तुटलेले, ग्रीपा नाही. अश्या धोकादायक ट्रान्सफार्मर अनेक गावात शाळा, अंगणवाडी ग्रामपंचायत जवळ असुन आता पावसाचे दिवस असल्याने करंट लागणे प्रसंगी जिवीतहानी होण्याची शक्यता, असे गंभिर प्रश्न निर्माण झाले आहे. याबाबत ग्रामपंचायत, ग्रामस्थानी तक्रार विद्युत विभागाला दिले परंतु संबंधीत अधिकारी व लाईनमन कार्यवाही करत नाही. कृषीपंप ट्रान्सफार्मर दुरुस्ती काम काढून नविन पेटी फाटक ग्रीपा टाकणे, 2018 मध्ये कृषीपंप डिमांड धरकांना विद्युत जोडणे, गावातील लोंबलेले तारा त्यावर चढलेले वेल व झाडाची फांदी कापणे, शिंदोला उपकेंद्र हे वणी वरून 33 केव्ही विधृत वाहीनी 40 कि.मी. अंतर जास्त असल्यामुळे मुबलक व पुर्णवेळ विज पुरवठा होत नाही.

शिरपुर परिसर डोलोमाईट, सिंमेंट दगड, कोळसा खनिज संपदेने संप्पन असतांना नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागतो हा खनिज संपदेने संप्पन भागातील नागरीकावर अन्याय आहे. विद्युत विभागाच्या वारंवार पुरवठा खंडित होणे यामुळे नागरीकामध्ये प्रचंड असंतोष असुन अन्यायाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची वेळ नागरीकावर येवु नये, समस्या सोडविण्यासाठी संबधीत विद्युत विभाग व 55 गावातील नागरीकांची अविलंब बैठक घेवुन समस्या सोडवावी अशी मागणी विजय पिदूरकर माजी जि.प. सदस्य, महादेव दातारकर मा. सरपंच कवडसी, शंकर बांदुरकर ग्रा.पं. सदस्य वेळाबाई , भाऊसाहेब आसुटकर यांनी निवेदनाद्वारे केली.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...