Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र...

चंद्रपूर - जिल्हा

चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र शैक्षणिक प्रगतीत चवथ्या क्रमांकावर..

चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र शैक्षणिक प्रगतीत चवथ्या क्रमांकावर..

पायाभूत सुविधा व डिजिटल लर्नींगमध्ये राज्यात अव्वल

गोंडपीपरी (चंद्रपूर) दि. ८ जून :  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रगतीमधील कार्यक्षमता, प्रतवारी दर्शक अंतरिम  अहवाल  २०१९-२० नुकताच घोषित करण्यात आला आहे. यात चंद्रपूर जिल्हाने संपूर्ण राज्यातून चवथ्या क्रमांक पटकावून नागपूर, अमरावती व नाशिकसारख्या जिल्ह्यांना  मागे टाकले आहे. याशिवाय  डीजीटल अध्ययन व शाळा सुरक्षितता व बाल संरक्षण या मूल्यमापन घटक विषयांत मुबंई, सातारा व नाशिक या राज्यातील अव्वल तीन जिल्ह्यांना मागे टाकत राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान चंद्रपूर जिल्हयाने पटकाविला आहे.

शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, शाळांच्या दर्जाचे मूल्यमापन व्हावे व विद्यार्थ्यांची आकलनक्षमता उंचवावी हा, या दरवर्षी जाहीर करण्यात येणाऱ्या अहवाल कार्यक्रमामागील उद्देश आहे. या कार्यक्षमता प्रतवारी दर्शक अहवालासाठी स्त्रोतमाध्यम म्हणून न्यास, यू -डायस, मिड-डे-मिल (मध्यान्ह भोजन योजना), शगुन, शाळासिद्धी, डायट व एनसीईआरटी आदी विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या अहवालात एकूण सहा मूल्यमापनाचे घटक कार्यक्षेत्र विचारात घेतले जात असून त्यात अध्ययन, निष्पत्ती वर्ग, आंतरक्रिया, पायाभूत सुविधा व विद्यार्थी हक्क, शाळा सुरक्षितता व बाल संरक्षण, डीजीटल अध्ययन आणि शासकीय प्रक्रिया यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. याशिवाय या अहवालात एकूण  ८३ मानके असून एकूण भारांश सहाशे दिलेला आहे .

चंद्रपूर जिल्याच्या नेत्रदीपक यशामागे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल कर्डिले यांची प्रेरणा व मार्गदर्शन, डायटचे प्राचार्य धनंजय चाफले व प्राथमिक शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे यांचे नियोजन व मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच जिल्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, विषयतज्ज्ञ, समावेशीत शिक्षणतज्ज्ञ, केंद्रप्रमुख यांचा सातत्यपूर्ण प्रयास, अनुभव व पाठपुरावाच्या माध्यमातून जिल्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने अथक परिश्रमातून हे उल्लेखनीय यश संपादित  केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...