Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *परंपरेला फाटा देत मरणोत्तर...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*

 

शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले

 

✍️राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी

 

वरोरा:- वरोरा तालुक्यातील शेगांव (खुर्द) येथील प्रतिष्ठीत नागरिक माजी पोलीस पाटील बालाजी पाटील सालेकर यांचे नुकतेच अंशीव्या वर्षी निधन झाले त्यांची मरणोत्तर क्रिया पंचक्रोशीत चर्चेचा विषय झाल्याचे दिसून येत असून, मरणोत्तर क्रियेत अस्थिरक्षा विसर्जन शेतातच वृक्षारोपनाने  करण्यात आले. त्यानंतर ४ फेब्रुवारी २०२५ ला चौदावी कार्यक्रम शिवधर्म पद्धतीने संपन्न झाला, कार्यक्रमांची रूपरेखा बघून सर्व उपस्थित पाहुणेमंडळी अवाक झाली, यामध्ये मृतकाचे जेष्ठ पुत्र रामचंद्र सालेकर यांनीच स्वतः पुजाऱ्याची भूमिका बजावून यापूर्वी कधीही न बघितलेला असा आगळा वेगळा मरणोत्तर चौदावी संस्कार कार्यक्रम जिजाऊ वंदनेने प्रारंभ झाला.आपल्या महान निसर्गपूजक मातृसत्ताक बळीशिवसिंधू संस्कृतीची महती ऐकताना उपस्थित महिला मंडळी भारावून गेली होती. शिवधर्म गाथेतील मरणोत्तर क्रियेचे केलेले वाचन व त्यातील संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून घरच्या सदस्याचा घरी मृत पार्थिव झाकून ठेऊन जीवंत मुलाबाळाच्या जगण्यासाठी प्रथम पेरणीला प्राधान्य  देणाऱ्या शेतकऱ्याचे, गाथेतल्या अभंगातून केलेले निरूपण श्रोत्यांना फार भाळले प्रथम प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यायचे हे सांगताना डॉक्टर नी घरच्या मृत पार्थिवा अगोदर जीवंत पेशंटच्या शस्त्रक्रियेला महत्व दिले पाहीजे, विद्यार्थ्याने नोकरीच्या इंटरव्हूला तथा परीक्षेच्या पेपर ला महत्व दिले पाहिजे असे  गाथेतल्या अभंगातून केलेले निरूपण उपस्थितांच्या मनाला चटका लावून गेले, तुकारामांनी अभंगात वेळेचे महत्व विषद करतांना शेतकऱ्याची पेरणी सुरु असतांना ओटीतल बी मुठीत येते,मुठीतल बी ज्या क्षणी भुमातेच्या पोटी जाते त्याच क्षणी जोराचा पाऊस किंवा अडथडा आला तर मुठीतून न सुटलेलं बी परत ओटीत जाऊन पीक येण्यापासून वंचित राहील मात्र त्याच क्षणी भुमातेच्या उदरात पोहचलेले बी बहरून येईल अंतर फक्त एका क्षणाचे होते, यावरून वेळेच्या एका क्षणाचं महत्व किती असते हे सर्व निस्तब्ध समरस होऊन ऐकत होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक शिवश्री मनोहर माडेकर सर बल्लारशा कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ उपस्थित होते त्यांनी या शिववासी संस्कार कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना समाजाने आता बदलणे काळाची गरज असून समाजाला दिशा देणारे असे बोधप्रद कार्यक्रम  होणे गरजेचे असून,समाजाच्या उन्नतीसाठी अनिष्ट परंपरा कर्मकांडाच्या जोखडातून समाजाने बाहेर पडणे आवश्यक असल्याचे सांगितले,त्यासाठी लोकं काय म्हणेल याची पर्वा न करता सालेकर परिवाराने उचललेले पाऊल हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर झाडे यांनी मायबापाची सेवा हीच ईश्वर सेवा असून तेच खरे आपले देव आहे, जीवंतपणी त्यांची सेवा करण्याची संधी न दवडणाऱ्याला कोणतेही तीर्थ करण्याची गरज नसून सर्व तीर्थ मायबापाच्या चरणाजवळ असल्याचे सांगितले या संस्कार पूजन कार्यक्रमानंतर पाहुणे श्रोते मंडळी असेचं कार्यक्रम व्हायला हवे असे बोलत असल्याचे दिसून आले, अनेकांना शिवधर्म गाथेचीही ओढ दिसून आली हे गाथा पुस्तक मिळेल का म्हणून वयस्क महिला सुद्धा विचारत होत्या.आयुष्यात सुखद आणि बोधप्रद असा एकमेव तेरवीचा कार्यक्रम अनुभवला असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मंडळी व्यक्त करतांना दिसत होती. यावरून लोकांचा प्रतिसाद लक्षात घेता परिवर्तन स्वीकारण्यास समाज तयार असून दिशा देणारे कमी पडत असल्याची खंतही शिवसेवक रामचंद्र सालेकर यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

वरोरातील बातम्या

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* *वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना*

*मारेगाव येथील लेकीची सासरवाडीत 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत घेतला गळफास* वरोरा तालुक्यातील शेगाव येथील घटना ✍️दिनेश...

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी*

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-वरोरा तालुक्यातील...

उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा

वरोरा: दिनांक १४ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात...