विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .
वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
राजुरा
राजुरा:-सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करतो. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाला असून त्याबद्दल प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनापासून आभार मानतो.बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी भेट दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांहून १ लाख करण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. कॅन्सरसह इतर गंभीर आजारांवरील ३६ जीवनावश्यक औषधांवरील सीमाशुल्क संपूर्णपणे माफ केल्याने जिवनावश्क औषधे स्वस्त होणार आहेत.देशातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर झालेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी, प्रत्येक समाजघटकाला बळ मिळणार आहे. देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला बळ मिळणार असून देशात तयार होणारे कपडे, चामड्याच्या वस्तू, मत्स्योत्पदनांवरील शुल्क कमी झाल्याने महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल, असा विश्वास आहे.शेतकरी, महिला, युवक, गरीब वर्गासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. महिलांच्या कौशल्याविकास प्राधान्याचा विषय आहे. पंतप्रधान धनधान्य योजनेंतर्गत शेती उत्पादकता वाढ, शेतमाल साठवणूक सुविधा, सिंचन आणि क्रेडीट सुविधांवर भर देण्यात येणार असून शंभर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होईल. कापूस आणि डाळींच्या उत्पादनवाढीसंदर्भात घेतलेले निर्णयही महाराष्ट्राच्या फायद्याचे आहेत. किसान क्रेडीट कार्डची मर्यादा ५ लाख करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. देशाला जगाचे फूड बास्केट बनवण्यात महाराष्ट्राची भूमिका प्रमुख असेल.महाराष्ट्र हे शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. सरकारी शाळांमध्ये ५ लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे, शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणं, भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करुन देणे, आयआयटीमधील तसेच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी संख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा राज्यातील युवकांना निश्चितपणे होईल. ऑनलाईन गिग वर्कर्ससाठी ओळखपत्र तयार करून त्यांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा निर्णय महत्वाचा असून सुमारे १ कोटी गिगवर्कर्सना पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. हे सर्व निर्णय विद्यार्थी, युवक, समाजातील सामान्य घटकांना केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आले आहेत.न्यूक्लिअर एनर्जी मिशनच्या माध्यमातून २०४७ पर्यंत १०० गिगावॅट ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य देशाला महासत्तेकडे नेणारे महत्वाचे पाऊल आहे. शहरांमध्ये सुधारणा राबवण्यासाठी सरकार १ लाख कोटींचा अर्बन चॅलेंज फंड निर्माण करण्याचा निर्णयही तितकचा महत्वाचा आहे. देशात १२० ठिकाणी उडान योजना राबवण्याचा त्यातून हवाई प्रवासी संख्या ४ कोटींवर नेण्याचा संकल्प आहे. देशातील ५२ प्रमुख पर्यटन स्थळांच्या विकासाचेही धोरण आहे. ही विकसित राष्ट्रासाठीची, महासत्तेच्या वाटेवरील आधुनिक भारताच्या निर्मितीसाठीची मजबूत पायाभरणी आहे. देशाला विकसित भारत, आर्थिक महासत्ता बनवण्याच्या प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आजचे अर्थसंकल्प रोडमॅप ठरेल. असा विश्वास वाटतो.
वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...
*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते ✍️गडचिरोली...
वणी: पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. मकर संक्रांतिनिमित्त हा कार्यक्रम स्थानिक...
वणी -राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर...
*अर्थसंकल्पीय प्रतिक्रया आमदार.देवराव भोंगळे* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती...
वणी:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन- अध्यापना बरोबरच,शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक...
*अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस ; सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच : माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष...
*ओबीसी विद्यार्थ्यांचा मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित मासिक निर्वाह व भोजन भत्ता घ्या!* *आमदार देवराव भोंगळे यांची...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...