Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *तालुका कॉंग्रेसचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*

 

*आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात!*

 

✍️दिनेश झाडे

 गोंडपिपरी

गोंडपिपरी:-दि. ०१गोंडपिपरी तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार यांनी आज राजुरा येथील भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालयात आमदार श्री. देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यावेळी आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी त्यांचे गळात पक्षाचा दुपट्टा टाकून भाजपात स्वागत केले.राजुरा विधानसभेचा निकाल हा ऐतिहासिक असाच ठरला. देवराव भोंगळे हे तिसऱ्या क्रमांकावर राहतील अशी भाकीत मांडणाऱ्या राजकीय पंडीतांचे सर्व दावे चुकीचे ठरवत भाजपचे देवराव भोंगळे हे चार माजी आमदारांना शह देत निवडून आले. थेट जनसंपर्क, गोरगरीबांच्या सेवेला धावून जाण्याची आत्मियता आणि प्रभावी प्रचारयंत्रणा हे भोंगळेंच्या विजयासाठी जमेची बाजु ठरले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केले.निवडणुकीच्या प्रचारपुर्व काळापासूनच देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तरूणांची भाजपला पसंती दिसून येत होती. श्री. भोंगळे आमदार झाल्यानंतर  राजुरा विधानसभेत पक्षप्रवेशाचा वेग वाढला असून आमदार भोंगळे यांच्या नेतृत्वात विधानसभेत दररोज शेकडो प्रवेश होत आहेत. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता भाजपात जोरदार इनकमिंग होत असल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे.पुर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते असलेले संगमवार हे मध्यंतरीच्या काळात कॉंग्रेसमध्ये गेले होते. परंतू देवराव भोंगळे निवडून येताच 'विकासाचा वादा, देवराव दादा' म्हणत ते पुन्हा भाजपवासी झाले.यावेळी तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, जिल्हा उपाध्यक्ष बबन निकोडे, तालुका महामंत्री निलेश पुलगमकर, जेष्ठ नेते दिपक बोनगिरवार,  बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे, भाजयुमोचे महामंत्री व बाजार समितीचे उपसभापती स्वप्नील अनमूलवार, साईनाथ मास्टे, सुहास माडूरवार, सुरेश धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...