Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अवैध धंद्याना ऊत.आमदार...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना: - तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील, शेवटचे तालुका स्थळ असलेल्या, कोरपना येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नारंडा. पारडी. कोरपना‌. येथे अवैध धंदे वाढले आहे. परंतु यावर आर्थिक मधुर संबंधापोटी दुर्लक्ष होत असल्याची तालुका भरात खमंग चर्चा आहे.प्राकृतिक दृष्ट्या अतिदुर्गम व मागास भाग असल्याने कोरपना परिसराकडे पाहिजे तसे वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्याचे लक्ष राहत नाही. या पुरेपूर संधीचा फायदा घेत परिसरात अनेक अवैध धंदे बोकाळले आहे. यातच गुन्हेगारी प्रवृत्तीने मोठ्या प्रमाणात जोर काढला आहे. यामध्ये या व्यवसायिकाकडून मुजोरी होत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. ठाणे हद्दीत अवैध दारू विक्री , सट्टापट्टी ,मटका ,जनावर तस्करी, भंगार चोरी , विविध अमली पदार्थांच्या तस्करी , कोंबड बाजार , चोरट्या वाहतुकी तसेच चोरीच्या घटनातही लक्षनिय वाढ झाल्याचे दिसून येते. तसेच दाखल झालेल्या विविध गुन्ह्याच्या तपासातही कासवगती दिसून येते.

 

*रस्त्यावरच उभी असतात वाहने*

 

कोरपना ठाणे हद्दीतील दालमिया सिमेंट चौपाटी, कोरपना बस स्थानक, नारंडा फाटा येथे रस्त्यावरच वाहने उभी राहतात.यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होतो आहे. परंतु याची व्यवस्था लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे.

 

*सीसीटीव्ही यंत्रणा व दूरध्वनी बंद*

 

कोरपना पोलीस ठाण्यांतर्गत कोरपना शहरात सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आली आहे. परंतु ती नादुरुस्त पडली आहे. त्यामुळे शहरावर लक्ष ठेवणारा तिसरा डोळाच सद्यस्थितीत बंद आहे. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षापासून पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद आहे. त्यामुळे एखादी महत्त्वाची घटना घडल्यास कशी माहिती द्यायची व संपर्क साधाचा यावर प्रश्नचिन्ह  उभे आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्याचे होणारे दुर्लक्ष सुद्धा तेवढेच कारणीभूत आहे.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

कोरपनातील बातम्या

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...

प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम !

चंद्रपूर :दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे प्रोएँक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षा घेण्यात...