Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *चंद्रपूरात काँग्रेसकडून...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*चंद्रपूरात काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा : गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करीत व्यक्त केला निषेध* *जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन*

*चंद्रपूरात काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा : गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करीत व्यक्त केला निषेध*    *जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन*

*चंद्रपूरात काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा : गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करीत व्यक्त केला निषेध*

 

*जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर :-भारतीय राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय संसदेत विशेष चर्चा सुरू असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भर संसदेत आक्षेपार्ह विधान करून त्यांचा घोर अपमान केला असून देशातील जनमानसाच्या भावना दुखावल्या आहेत. याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वतःहून द्यावा तसेच देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याने तात्काळ प्रभावाने आपल्या स्तरावरुन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करीत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गृहमंत्री शाह यांच्या त्या वक्तव्याचा जोरदार निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना निवेदन देण्यात आले.यावेळी केंद्र व राज्य सरकार च्या निष्क्रियतेमुळे देशात व राज्यात वाढता गुंडाराज, महिलांवरील अत्याचार, भाजपच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर हल्ला, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान, परभणीतील वडार समाजातील भीमसैनिक - सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील संशयास्पद मृत्यू, बिड जिल्हातील मस्साजोग गाव चे सरपंच संतोष देशमुख हत्या, कल्याणमध्ये मराठी माणसावर गुंड पाठवून हल्ला या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, राज्यात कायदा सुव्यवस्था पुर्णपणे बिघडलेली आहे. हे सरकार मंत्रिमंडळातील नेत्यांचा, पोलिसांचा बचाव करीत जनतेवर अन्याय करीत आहेत. देशातील जनतेने वारंवार मागणी करूनही जातीय जनगणना करण्यास व  इव्हिएम मशीन ऐवजी बॅलेट पेपर वर निवडणूका घेण्यास भाजपप्रणित सरकार टाळाटाळ करीत आहे. राज्यात सोयाबीन, कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. खोट्या योजना व खोट्या आश्वासनाने सत्तेत आलेले हे सरकार जनतेवर होणारा अन्याय दूर करण्यात पुर्णपणे अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे कायद्याच्या या राज्यात संविधानाची उघड उघड पायमल्ली करून, गुंडाराज, अराजकता निर्माण होत असतांना केंद्र आणि राज्य सरकार मुग गिळून गप्प आहे. हे सरकार सर्व सामान्य जनतेला संरक्षण देण्यात अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांनी वरील सर्व बाबी लक्षात घेऊन तात्काळ प्रभावाने आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक जैस्वाल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रा. रमेशचंद्र दहिवडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, अनिरुद्ध वनकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, घनश्याम मुलचंदाणी, प्रवीण पडवेकर, नंदु नागरकर,  चंदाताई वैरागडे, महिला अध्यक्षा सुनंदा ढोबे, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, बेबीताई उइके, प्रशांत भारती, अरूण भेलके, करिमभाई, सोयल रजा शेख, प्रशांत दानव, संतोष लहामगे, प्रमोद बोरीकर, गोपाल अमृतकर, राजेश अडुर, इस्माईल शेख, अंकित रामटेके, अजय महाडोळे, रामकृष्ण कोंद्रा, मनिष तिवारी, वसंता देशमुख, शालिनी भगत, सुनीता अग्रवाल, सिमा वाघमारे, यासह जिल्ह्यातील काँग्रेस तथा महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

चंद्रपूरतील बातम्या

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम*

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* ✍️...