Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *बापाच्या विजयासाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन*    *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन*

 

*गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिपरी :-- लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या विधानसभा निवडणुक प्रचारार्थ लोकप्रिय खा. प्रतिभाताई धानोरकर आणि आ. सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते गोंडपिपरी येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तथा माता कन्यका सभागृह गोंडपिपरी येथे महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांची संवाद बैठक उत्साहात पार पडली. तसेच खा. प्रतिभा धानोरकर आणि आ. सुभाषभाऊ धोटे यांनी संयुक्तपणे गोंडपिपरी तालुक्यातील मौजा विठ्ठलवाडा, भंगाराम तळोधी, हिवरा, धाबा, लाठी,  सकमूर, वेजगाव, आर्वी, तोहगाव, परसोडी येथे गाव भेटी दौरा करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मार्गदर्शन करताना खा. प्रतिभा धानोरकर म्हणल्या की, लोकसभा निवडणुकीत आ. सुभाष धोटे यांनी मला विजयी करण्यासाठी बापाची भुमिका पार पाडून मला प्रचंड बहुमताने निवडून आणले आता मी लेकीची भुमिका पार पाडुन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी परिश्रम घेणार असल्याची ग्वाही दिली. तर आ. सुभाष धोटे यांनी सांगितले की, क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले आणि विविध विकासकामे पूर्ण केली असून येणाऱ्या काळात आपण सर्वांगसुंदर राजुरा विधानसभा मतदारसंघांच्या निर्मिती व सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करणार आहे त्यामुळे मला पून्हा प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.यावेळी जेष्ठ काँग्रेस नेते सुरेश पाटील चौधरी, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेस निरिक्षण अनुपम सर, विजेएनटी विभाग प्रदेश अध्यक्ष अॅड. पल्लवी रेनके, नगराध्यक्षा सविता कुडमेथे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, सोनूताई दिवसे, देवेंद्र बट्टे, शिवसेनेचे सुरज माडुरवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणाल गायकवाड, काँग्रेस कार्याध्यक्ष निलेश संगमवार, शहराध्यक्ष राजू झाडे, माधुरीताई येलेकर, सुनील संकुलवार, अजय माडुरवार, अनिल झाडे, प्रवीण नरहरशेट्टीवार, अशोक रेचनकर, देविदास सातपुते, मनोज नागापुरे, साईनाथ कोडापे, राजू चंदेल, रफिक शेख, माधव लडके, गौरव घुबडे, नरेश तुंबडे, शीलाताई बांगरे, वनिता वाघाडे, रंजना रमागिरकर, नगरसेवक बांबोडे, गौतम झाडे, यासह गोंडपिपरी तालुक्यातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस, राष्ट्रवादी (श. प), शिवसेना (उभाठा), आम आदमी पार्टी, व सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मातंग समाजाचा मनसेला पाठींबा, उंबरकरांचे वाढतंय बळ 12 November, 2024

मातंग समाजाचा मनसेला पाठींबा, उंबरकरांचे वाढतंय बळ

वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...

१४ नोव्हेंबर रोजी संजय देरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा. 12 November, 2024

१४ नोव्हेंबर रोजी संजय देरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा.

वणी : शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी...

साहेबराव कांबळे साठी नाना पटोले यांची जाहीर सभा, कार्यकर्ते आणि जनतेचा अथांग जनसागर जमला. 12 November, 2024

साहेबराव कांबळे साठी नाना पटोले यांची जाहीर सभा, कार्यकर्ते आणि जनतेचा अथांग जनसागर जमला.

उमरखेड (सय्यद रहीम रजा ):आज सोमवार ला महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे च्या प्रचारासाठी नाना पटोले यांची...

शेवटच्या दोन दिवशी उमेदवारांनी प्रचार जाहिरातींचे प्रमाणिकरण आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया 12 November, 2024

शेवटच्या दोन दिवशी उमेदवारांनी प्रचार जाहिरातींचे प्रमाणिकरण आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

यवतमाळ : राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुकीचा दिवस व आदल्या दिवशी वर्तमानपत्रात...

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या नाफेड ला मनसेचा दणका! 12 November, 2024

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या नाफेड ला मनसेचा दणका!

वणी :मतांचा जोगवा आणि फोडाफोडीचे राजकारण करण्यात साऱ्या पक्ष आणि उमेदवार मश्गूल असताना, इकडे महाराष्ट्र नवनिर्माण...

भरारी पथकाने वणी शहरात ६० लाख रुपये जप्त केले. 11 November, 2024

भरारी पथकाने वणी शहरात ६० लाख रुपये जप्त केले.

वणी:- शहरातील एसबीआय बँके मधून ६० लाख रुपये सिमेंटच्या पोत्यात भरून घेऊन जात असताना भरारी पथकांनी टागोर चौक परिसरात...

गोंडपिपरीतील बातम्या

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...