Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *ही मनुस्मृती विरुद्ध...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*ही मनुस्मृती विरुद्ध संविंधानाची लढाई - विजय वडेट्टीवार* *महागाई, बेरोजगारी, व महीला अत्याचारामुळे महायुती सरकार अपयशी*

*ही मनुस्मृती विरुद्ध संविंधानाची लढाई - विजय वडेट्टीवार*    *महागाई, बेरोजगारी, व महीला अत्याचारामुळे महायुती सरकार अपयशी*

*ही मनुस्मृती विरुद्ध संविंधानाची लढाई - विजय वडेट्टीवार*

 

*महागाई, बेरोजगारी, व महीला अत्याचारामुळे महायुती सरकार अपयशी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-गेल्या दहा वर्षात केंद्रातील मोदी सरकारने जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून केवळ व्यापारी हित जोपासत देशातील गोरगरीब जनतेला महागाईच्या आगीत झोकले. आज तरुणांपुढें रोजगाराचा गंभीर प्रश्न, मुली, महिलांवरील वाढलेले अत्याचाराचे प्रमाण, बेपत्ता झालेल्या  महिलांचा अजूनही शोध नाही. याचा राज्यातही समान अनिष्ट परीणाम जाणवत आहे. या विवीध कारणांमुळे देश व राज्यातील जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. आता होऊ घातलेली महाराष्ट्राची निवडणूक हि देशाला नवी दिशा देणारी असुन मनुस्मृतीच्या विळख्यातून देश वाचवायचा असेल तर मनुस्मृती विरूध्द सुरु असलेल्या संविधान बचावच्या लढाईत सहभागी व्हा असे आव्हान राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.ते सावली तालुक्यांत कार्यकर्ता संवाद बैठकीत मार्गदर्शनक म्हणून बोलत होते.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी  सावली तालुक्यातील सिर्सी, साखरी, हरंबा, लोंढोली, कडोली, डोनाळा, उपरी, कापसी, नीलसनी, व्याहाड (बूज) वाघोली (बुटी) गाव भेटीतून काँग्रेस तसेच महाविकास आघाडी व सर घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची संवाद साधला.यावेळी मार्गदर्शनपर बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपा तथा महायुतीने प्रत्येकाला १५ लाख देऊं अशी खोटी आमिषे दाखवून केंद्रात सरकार स्थापन केली. यानंतर स्वाय्यत संस्थांना हाताशी धरून पक्ष फोडीसाठी कट कारस्थान रचून महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम केले. पक्ष फोडले, लोकांची घरे फोडली.शिवरायांचा पुतळा निर्मितीत  कमिशन खोरी करून त्यांचा अपमान केला. खोटी आश्वासने पोकळ योजना, जाती धर्मामध्ये विभागून सत्ता प्राप्तीसाठी वाट्टेल ते प्रकार महायुती कडून सुरु आहे. मात्र देशांतील व महाराष्ट्रातील सुज्ञ जनता यांनी महायुतीला नाकारून लोकसभेत संविधान वाचवण्यासाठी लढाई लढली. हेच महापापी सरकार आता 15 लाखावरुन 1500 वर आले असून महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून लाडकी बहीण योजना घेऊन मिरवत आहे. अशी टीका देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महायुती सरकारवर केली. संकट अजूनही टळलेले नाही. येत्या 20 नोव्हेंबर रोजी देशातील व राज्यातील बहुजनांना गुलाम बनवू पाहणाऱ्या,महाराष्ट्राचे वैभव व स्वाभिमान गुजरात चरणी गहाण ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील सत्तापीपासू महायुतीला आपल्या मतदानातून धडा शिकवून त्यांची जागा दाखवा असे आवाहनही त्यांनी उपस्थित त्यांना केले.आयोजित बैठकीस सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने, राकेश गड्डमवार, विजय कोरेवार, किशोर गड्डमवार, कृष्णा राऊत,किशोर कारडे, संजय मेश्राम, अविनाश भुरसे, किशोर घोटेकर,तथा महाविकास आघाडी पदाधिकारी, सर्व ग्राम काँग्रेस अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*जनसुनावणीत वाढीव प्रकल्पातुन विकासाची अपेक्षा . स्थानिकांना नोकऱ्या घ्या. अनेक गावातील सरपंच व लोकप्रतिनिधीची उपस्थिती* 29 January, 2025

*जनसुनावणीत वाढीव प्रकल्पातुन विकासाची अपेक्षा . स्थानिकांना नोकऱ्या घ्या. अनेक गावातील सरपंच व लोकप्रतिनिधीची उपस्थिती*

*जनसुनावणीत वाढीव प्रकल्पातुन विकासाची अपेक्षा . स्थानिकांना नोकऱ्या घ्या. अनेक गावातील सरपंच व लोकप्रतिनिधीची उपस्थिती* गडचिरोली...

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन. 28 January, 2025

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.

वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट. 28 January, 2025

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट.

वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा. 28 January, 2025

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा.

वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक. 28 January, 2025

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक.

वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...

*जिल्हा परीषद शाळा  शिवणी (जहाँ)येथे  76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या  उत्साहात  संपन्न* 28 January, 2025

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न*

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...