Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *अपघातग्रस्त युवकांकरिता...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*अपघातग्रस्त युवकांकरिता देवदूतासारखे धावले भूषण फुसे* *राजुरा बल्लारपूर मार्गावर पेट्रोल पंपाजवळील घटना*

*अपघातग्रस्त युवकांकरिता देवदूतासारखे धावले भूषण फुसे*    *राजुरा बल्लारपूर मार्गावर पेट्रोल पंपाजवळील घटना*

*अपघातग्रस्त युवकांकरिता देवदूतासारखे धावले भूषण फुसे*

 

*राजुरा बल्लारपूर मार्गावर पेट्रोल पंपाजवळील घटना*

 

रस्त्यावरील घटना.भूषण फुसे यांच्या समयसूचकतेने अपघातग्रस्ताला मिळाले वेळेत उपचार

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-राजुरा - बल्लारपूर मार्गावर ओम साई  मंगल कार्यालयाच्या समोर गेल्यावर येणाऱ्या पेट्रोल पंप जवळ एक दुचाकीस्वार रस्त्यावर पडलेला दिसला. काही लोक अपघातग्रस्त दुचाकीस्वाराकडे पाहत होते. तितक्यातच राजूराहून चंद्रपूरकडे कार ने निघालेले सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे याना रस्त्यावर लोक जमा झालेले दिसले. कार थांबवत भूषण फुसे यांनी बघितले कि अपघातग्रस्त युवकाच्या डोक्यातून रक्त वाहत आहे. त्याचा डोक्याला जबर मार लागलेला दिसला. अपघातग्रस्ताची विचारपूस करत १०८ रुग्णवाहिकेला फोन करून तात्काळ घटनास्थळी बोलाविले. स्वतः आणि जमा झालेल्या होतकरू लोकांच्या साहाय्याने भूषण फुसे यांनी अपघातग्रस्त युवकाला रुग्णवाहिकेत ठेवले व स्वतः ग्रामीण रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना भेटून योग्य उपचाराची विनंती केली. अपघातग्रस्त लोकांच्या मदतीकरिता सहजासहजी कुणीही सामोरे येत नाही. मात्र भूषण फुसे यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि जखमी दुचाकीस्वाराचा आता उपचार सुरु झाला आहे. मात्र दुचाकीस्वाराचे नाव कळू शकले नाही घटनास्थळी MH 34 BW 7120 या क्रमांकाची दुचाकी आढळून आली. 'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीनुसार भूषण फुसे जखमी युवकांकरिता देवदूतासारखे धावून गेले. भूषण फुसे यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

आमदाराने विकासाच्या नावावर फक्त कमिशन खोरीचे धंदे केले -राजू उंबरकर यांचा घणाघात 13 November, 2024

आमदाराने विकासाच्या नावावर फक्त कमिशन खोरीचे धंदे केले -राजू उंबरकर यांचा घणाघात

वणी : विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर 13 November, 2024

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

राजू उंबरकरच्या प्रचारात महिलांचा मोठा सहभाग 13 November, 2024

राजू उंबरकरच्या प्रचारात महिलांचा मोठा सहभाग

वणी: मनसेने सर्व बाजूने मतदारांना केंद्रित करत प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. यात सर्वाधिक संख्या युवा आणि...

संजय खाडे यांच्या प्रचारासाठी पत्नी संगीता खाडे मैदानात, महिलाशक्तींनी पिंजून काढले वणी शहर, रोज विविध गावांचा दौरा. 13 November, 2024

संजय खाडे यांच्या प्रचारासाठी पत्नी संगीता खाडे मैदानात, महिलाशक्तींनी पिंजून काढले वणी शहर, रोज विविध गावांचा दौरा.

वणी -:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी आता अवघा आठवडा उरला असतांना...

मातंग समाजाचा मनसेला पाठींबा, उंबरकरांचे वाढतंय बळ 12 November, 2024

मातंग समाजाचा मनसेला पाठींबा, उंबरकरांचे वाढतंय बळ

वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजु उंबरकर यांच्याकरिता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मैदानात...

१४ नोव्हेंबर रोजी संजय देरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा. 12 November, 2024

१४ नोव्हेंबर रोजी संजय देरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा.

वणी : शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी...

राजुरातील बातम्या

संघटनेचे समर्थन* *संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने'' विरोधक धास्तावले या ''ठाकरे'' ने दिले आता समर्थन* @राजुरा विधानसभा क्षेत्र ७०

*''या'' उमेदवाराला मिळाले पुन्हा ''या'' कामगार संघटनेचे समर्थन* *संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने'' विरोधक धास्तावले.या...

*क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा रथ अविरतपणे पुढे नेण्यासाठी कटिबद्ध : आमदार सुभाष धोटे*

*क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा रथ अविरतपणे पुढे नेण्यासाठी कटिबद्ध : आमदार सुभाष धोटे* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...