Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *क्षेत्राच्या सर्वांगीण...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा रथ अविरतपणे पुढे नेण्यासाठी कटिबद्ध : आमदार सुभाष धोटे*

*क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा रथ अविरतपणे पुढे नेण्यासाठी कटिबद्ध : आमदार सुभाष धोटे*

*क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा रथ अविरतपणे पुढे नेण्यासाठी कटिबद्ध : आमदार सुभाष धोटे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:--  राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आपण सातत्याने रस्त्यावर तसेच विधानसभेत आवाज उठविला आणि अनेक विकासकामे मार्गी लावले आहेत. क्षेत्रात आरोग्य सेवा बळकट करणे, शेतकर्‍यांसाठी सिंचन सुविधांची निर्मिती तसेच पांदन रस्ते, प्रशासकीय भवन, रूग्णालय, वस्तीगृह इमारतीचे बांधकाम करणे, विविध योजने अंतर्गत घरकुलांची निर्मिती, ग्रामीण व शहरी भागात विज, रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, पर्यटन विकास, सामाजिक सभागृहे, वाचनालये, व्यायामशाळा, क्रीडांगणे, बगीचे, महापुरुषांच्या पुतळ्यांची निर्मिती व सौंदर्यीकरण, तलाव सौंदर्यीकरण, दलित वस्ती, नक्षलग्रस्त भागाचा विकास, नागरी सुविधा व तीर्थक्षेत्र योजने अंतर्गत विविध विकासकामे इत्यादी भरीव विकासकामे आपल्या कारकीर्दीत पुर्ण केली असून येणाऱ्या काळातही राजुरा विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा रथ अविरतपणे पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी पत्रकार बांधवांसाठी आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यात दिली.ते पुढे म्हणाले की, आरोग्य क्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन क्षेत्रातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे काम केले. राजुरा येथे ७ कोटी रुपये निधीचे श्रेणीवर्धित १०० खाटांचे  उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करून येथे आवश्यक मनुष्यबळ व संसाधन सुविधा उपलब्ध केल्या, २. ५० कोटी निधीचे मोफत सिटी स्कन तपासणी केंद्राची निर्मिती केली असून डायलसिस केंद्र उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. क्षेत्रात विरूर स्टेशन, भंगाराम तळोधी, धाबा, शेनगाव, नांदाफाटा येथे आरोग्य केंद्र निर्मिती व आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या तसेच गडचांदूर येथे ग्रामीण रुग्णालय इमारतीचे नुतनीकरण व सुविधा उपलब्ध केल्या. क्षेत्रातील शेतकर्यांचसाठी ७० कोटी निधीचे गेटेड साठवण बंधाऱ्यांची निर्मिती केली, पांदन रस्ते, विज जोडण्याची कामे केली आहेत. क्षेत्रातील विहीरगाव, अहेरी,  डोंगरगांव, तोहगाव, भंगाराम तळोधी येथे ३३ केव्ही विद्युत केंद्राची निर्मिती केली. तसेच क्षेत्रात प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण, ग्राम विकास योजना, विविध घरकुल योजना, आमदार स्थानिक विकास निधी, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, एल. डब्लु. ई., हॅम अंतर्गत रस्त्यांची निर्मिती, अग्निशमन यंत्रणा सक्षम केली, ठक्कर बाप्पा योजनेची विकासकामे केली, क्षेत्रात वरूर रोड, शेनगाव येथे महिला बचत भवणाची निर्मिती केली. क्षेत्रात दलित वस्ती, नक्षलग्रस्त भागाचा विकास, नागरी सुविधा व तीर्थक्षेत्र योजने अंतर्गत कोट्यवधी रुपये निधीची विविध विकासकामे मंजुर केलीत. पकडीगुड्डम धरणाच्या कॅनलींग च्या कामासाठी ११० कोटी मंजूर झालेले आहेत.क्षेत्रात राजुरा, गडचांदूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची निर्मिती, राजुरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ शुशोभीकरण केले,  क्रांतीवीर शहीद भगवान बिरसा मुंडा चौकाचे सौंदर्यीकरण कामाला मंजूरी,सोनापूर, लखमापूर येथे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याची निर्मिती, जिवती येथे लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची निर्मिती, सितागुडा येथे वीर शामादादा कोलाम यांच्या पुतळ्याची निर्मिती. राजुरा येथे ५ कोटीचे सर्व सुविधायुक्त पशुवैधकीय सर्व चिकीत्सालयाची निर्मिती, राजुरा, गोंडपिपरी येथे प्रशासकीय इमारतीची निर्मिती, जिवती येथे सा. बां. उपविभागीय कार्यालय व शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम, अमलनाला येथे ७ कोटी निधीतून अमलनाला पर्यटन विकास व  सौंदर्यीकरण, राजुरा येथे ८ कोटीचे तलाव सौंदर्यीकरण, भेंडाळा प्रकल्पाच्या उर्वरित निर्मानाधीन कामांसाठी ३०८ कोटी, बेरडी पुनर्वसीत गावाच्या विकासासाठी ४. २५ कोटी, प्रधान मंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सुमठाणा नाल्यावरील पुलाचे बांधकाम ५ कोटीचे तसेच सिंधी विरूर स्टे. रस्त्याचे काम पुर्ण करून व ५ कोटीच्या पुलाची निर्मिती केली , सामाजिक न्याय विभागाचे १०० विद्यार्थी क्षमतेचे निवासी वस्तीगृहाची निर्मिती, शहरालगत व विरूर स्टेवन येथे उद्यानाची निर्मिती यासह कोट्यवधी रुपये निधीची अनेक मुलभूत विकासकामे पूर्ण केली असून येणाऱ्या काळात आपण सर्वांगसुंदर राजुरा विधानसभा मतदारसंघांच्या निर्मिती व सर्वांगीण विकासासाठी पून्हा एकदा विधानसभा निवडणूकीला सामोरे जात असून क्षेत्रातील जनतेने आपल्याला पून्हा प्रचंड बहुमताने विजयी करावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती विकास देवाळकर, अशोकराव देशपांडे, दिनकर कर्नेवार, पंढरी चन्ने, जिल्हा महासचिव एजाज अहमद, प्रा. प्रफुल्ल शेंडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

राजुरातील बातम्या

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात*

*उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

संघटनेचे समर्थन* *संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने'' विरोधक धास्तावले या ''ठाकरे'' ने दिले आता समर्थन* @राजुरा विधानसभा क्षेत्र ७०

*''या'' उमेदवाराला मिळाले पुन्हा ''या'' कामगार संघटनेचे समर्थन* *संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने'' विरोधक धास्तावले.या...

*अपघातग्रस्त युवकांकरिता देवदूतासारखे धावले भूषण फुसे* *राजुरा बल्लारपूर मार्गावर पेट्रोल पंपाजवळील घटना*

*अपघातग्रस्त युवकांकरिता देवदूतासारखे धावले भूषण फुसे* *राजुरा बल्लारपूर मार्गावर पेट्रोल पंपाजवळील घटना* रस्त्यावरील...